✍🏻✍🏻✍🏻 *...* *DNP*
*[ना वाद,ना विवाद-फक्त सुसंवाद]*
🍁 *बदली विशेष-टप्पा क्र.5 (संवर्ग 4)*🍁
(13.10.2017 च्या न्यायालयीन आदेशानंतर सुधारित व मूळ 27.02.2017 च्या शासन निर्णयानुसार)
*बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या-Transfers Under Consideration*
*(TUC)*
*विशेष संवर्ग 1 व विशेष संवर्ग 2 शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली* असून आता *जिल्ह्यांतील सर्व* बदलीपात्र शिक्षकांसाठी *Transfer Portal* सुरु झाले आहे..
🍁 *बदलीपात्र शिक्षक* म्हणजे ज्या शिक्षकाची *अवघड क्षेत्रात किंवा सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सलग सेवा झाली आहे* असे शिक्षक..
🍁 *समानीकरणात ज्यादा* ठरवण्यात आलेल्या शिक्षकांचा समावेश *टप्पा क्र.5* मध्येच होतो..
🍁 या टप्प्यात समावेश असणा-या शिक्षकांना *आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ बदलीपात्र* शिक्षकांच्या जागा, *विशेष संवर्ग 1,विशेष संवर्ग 2* शिक्षकांच्या बदल्यांमुळे *रिक्त झालेल्या जागा (Created vacancy)* व *निव्वळ रिक्त जागा (Clear vacancy)* मागता येतील..
🍁 उपलब्ध जागांमधून 20 शाळा *पसंतीक्रमाने* निवडता येतील..
या टप्प्याच्या पहिल्या राऊंडमध्ये *पसंतीक्रमातील 20 शाळा* न मिळाल्यास *दुस-या राऊंडमध्ये पुन्हा एकदा उपलब्ध जागांमधून 20 पसंतीक्रम* भरण्याची संधी दिली जाईल.दुस-या राऊंड मध्येही 20 पैकी शाळा न मिळाल्यास संगणक *यादृच्छिकपणे (randomly)* उपलब्ध रिक्त शाळेवर नियुक्ती देईल..
🍁बदलीपात्र शिक्षकाने Online विवरणपत्र *न भरल्यास* व अशा शिक्षकांना *खो बसल्यास* त्यांना संगणक *यादृच्छिकपणे (randomly)* उपलब्ध शाळेवर नियुक्ती देईल..
🍁 एकाच जि.प.मध्ये 30 कि.मी.च्या आत कार्यरत असणारे पती-पत्नी शिक्षक दोघेही किंवा दोघांपैकी एकजण *विस्थापित* होत असतील म्हणजेच *प्रशासकीय* बदली होणार असेल किंवा *विनंती बदली* मागत असतील तर त्यांच्या एकत्रीकरणासाठी तशी tab देण्यात आली आहे..ही सुविधा *ऐच्छिक* असून तिचा लाभ घेण्याबाबत *स्वतः निर्णय घ्यावा*..कारण एकदा ही सुविधा घेण्याचे मान्य केल्यानंतर *बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर माघार घेता येणार नाही..*
🍁 पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेण्याची *इच्छा* असली तरी दोघांनाही *स्वतंत्र* वेगवेगळे *form* भरावे लागतील..
🍁 *विशेष संवर्ग 1 व 2 शिक्षकांच्या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या, निव्वळ रिक्त शाळा व बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असणा-या शाळा form भरताना आपणास System मध्ये दिसून येतील.*
🍁 विशेष संवर्ग 1व 2 यांना बदलीने मिळालेल्या जागा *Block* करण्यात आल्यामुळे पसंतीक्रम भरताना या जागा दिसणार नाहीत..
🍁 *म्हणजेच System मध्ये आपणास सर्व उपलब्ध जागा दाखवल्या जाणार आहेत..*
💻 *Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती*💻
🌷HM login वरुन *Transfer Portal login* करा..
🌷4 टॅब दिसतील,त्यातील *Intra-District Transfer* या टॅबला क्लिक करा..
🌷त्यातील 2री (नवीन) *TUC Application* या टॅबला क्लिक करा..
🌷 *Select Designation* मध्ये Headmaster/ Under graduate teacher/Graduate teacher यापैकी जे असेल ते क्लिक करा..
🌷 *Select teacher* मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..
🌷संबंधित शिक्षकाची *Staff portal* ला *Verify* केलेली माहिती दिसून येईल..
ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, *त्यांना विवरणपत्र भरता येणार नाही..* त्यांनी माहिती Verify करुन form भरावा..
🌷 *Select Category* मध्ये *Transfer Under Consideration* वर क्लिक करा..
🌷 *Select subject* मध्ये सहशिक्षक असेल तर *All subject* असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा *विषय* निवडा..
🌷बदलीची इच्छा नसेल परंतु कुणी खो दिल्यास प्रशासकीय बदली होणार असेल अशा शिक्षकांनी *Adminstrative ground (प्रशासकीय बदली)* या tab ला क्लिक करुन 20 पसंतीक्रम भरावेत..अशा शिक्षकांना *खो मिळाला नाही* तर त्यांची *बदली होणार नाही..*
🌷विनंती बदली करण्याची इच्छा असेल अशा शिक्षकांनी *Request ground (विनंती बदली)* या tab ला क्लिक करुन 20 पसंतीक्रम भरावेत..
दिलेल्या 20 पसंतीक्रमातील *जागा उपलब्ध* नसेल तर अशा शिक्षकांची बदली होणार नाही..
मात्र अशा शिक्षकांना *संवर्ग 1,2,3 आणि सेवाज्येष्ठ शिक्षक* यांचेकडून *खो* मिळाल्यास त्यांची *प्रशासकीय बदली* होईल..
🌷 *प्रशासकीय* किंवा *विनंती* form भरणा-या शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना *आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ,संवर्ग 1व 2 च्या बदल्यांमुळे रिक्त होणा-या (created vacancy) व निव्वळ रिक्त (clear vacancy)* जागा भराव्यात..
🌷पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेण्याची *इच्छा* असेल तर *Yes* ला क्लिक करा..नसेल तर *No* ला क्लिक करा..
🌷 पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेण्याची इच्छा असली तरी *दोघांनाही स्वतंत्र form* भरावे लागतील..
🌷 जोडीदाराचा *Staff ID* टाकून माहिती भरावी..
*अर्जदाराचा* form भरुन *Verify* झाल्यानंतरच जोडीदाराचा form भरावा..
जोडीदाराचा form भरताना *अर्जदाराने* जे पसंतीक्रम दिले आहेत त्याच्या *30 कि.मी.परिघातील* पसंतीक्रम द्यावेत..
🌷 या सुविधेचा लाभ घ्यायचा नसेल तर *No* ला क्लिक करावे..
🌷 सर्व माहिती बरोबर असेल तर *कमीत कमी 1* व *जास्तीतजास्त 20* पसंतीक्रम भरता येतील..
🌷पसंतीक्रम भरताना *जिल्हा* निवडा किंवा आपोआप दिसेल..
🌷त्यानंतर *तालुका* निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल..त्यातील हवा तो तालुका निवडा..
🌷 *Select village* मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..
🌷 *Select school* मध्ये निवडलेल्या महसूली गावातील जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा..
🌷अशाप्रकारे 20 शाळा निवडून *Add* करत राहा..
🌷भरलेल्या पसंतीक्रमामध्ये *Save* करण्याच्या आधी बदल करता येतील..
🌷पसंतीक्रम *delete* करता येईल.. *update* करता येईल..पसंतीक्रम *खाली-वर* करता येईल..
🌷 *आवश्यक* तसे विवरणपत्र भरल्यानंतर *Save* करा..
🌷अर्ज Save केल्यानंतर *प्रिंटसाठी* कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.3 *Veiw option(draft version)* क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..
🌷माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.4 *Verification of transfer application* क्लिक करा..
🌷माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास *Verify* करा..
🌷Verify केल्यानंतर विवरणपत्रात *कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही..* त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते *Verify* करण्यापूर्वीच करावेत..
🌷Verify केल्यानंतर टॅब क्र.5 *Print transfer application* मधून प्रिंट काढण्यापूर्वी Self certified या watermark सोबत *मा.अवर सचिव कांबळे साहेब* यांची स्वाक्षरी दिसेल..
अशी स्वाक्षरी दिसणा-या form चीच print काढावी..
🌺 *दक्षता*🌺
*Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..*
सर्व *बदलीपात्र* शिक्षकांनी form भरणे *बंधनकारक* आहे..बदली नको असेल त्यांनी *प्रशासकीय* तर बदली हवी असेल त्यांनी *विनंती* tab वापरुन form भरावेत..
*चुकीची माहिती भरुन बदली प्रक्रियेत फायदा घेतल्यास संबंधित शिक्षकाबरोबरच HM login वरुन form भरावयाचा असल्याने मुख्याध्यापकासही जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे..त्यामुळे बदली प्रक्रियेत आपले सहकारी चुकीची व खोटी माहिती भरणार नाहीत याची मुख्याध्यापकांनी काळजी घ्यावी..*
*Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी..1 प्रत BEO कार्यालयात जमा करावी..*
📣 *अधिक माहितीसाठी शासन निर्णय दि. 27.02.2017,शासन शुद्धीपत्रके दि.15.04.2017,दि.17.05.2017,दि.31.05.2017,शासन निर्णय दि.12.09.2017(रद्द झालेला), ग्रामविकास विभागाकडून वेळोवेळी येणारी पत्रे व मा.प्रदीप भोसले सर,सरल राज्य समन्वयक,NIC पुणे यांचेकडून वेळोवेळी येणा-या सरल सूचनांचे व Manual चे अवलोकन करावे..*
Pages
- Home
- Online Test निर्मिती
- नवोपक्रमाची यादी
- ज्ञानरचनावादी साहित्य यादी
- YouTube महत्वाची सेटिंग
- PPT कशी बनवावी
- Computer वर Andriod App वापरणे
- Computer स्लो चालत असल्यास
- ISO मानांकन निकष
- ऑफलाईन अँप निर्मिती
- कम्प्यूटर विंडोस कीबोर्ड शॉर्टकट्स
- रजेविषयी माहिती
- बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक
- महत्वाच्या pdf
- बदली महत्वाचे
- सातत्यपूर्ण मूल्यमापन श्रेणी
- Gr
- पायाभूत चाचणी शेकडेवारी कशी काढावी
- वजाबाकी करण्याची एक ट्रिक : ____ अनेकवेळा दुकानात...
- शिष्यवृत्ती माहिती
- शाळा सिध्दी रिपोर्ट
- शैक्षणिक उपक्रम
- बोधकथा
- गुगल फॉर्म तयार करणे
- 100%वाचन क्षमता कार्यक्रम
- महाराष्ट्रातील किल्ले
महत्वाची माहिती सर
ReplyDeleteउपयुक्त माहिती
ReplyDeleteमनस्वी अभिनंदन.
ReplyDeleteNice Mauli
ReplyDelete