बोधकथा

माझ्या ब्लॉगवर मी स्वागत करत आहे,.

100%वाचन क्षमता कार्यक्रम



  *मूलभूत वाचन क्षमता उपक्रम*
         💠 *श्रवण — 1* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन प्रशिक्षण  अंतर्गत उपक्रम.....*

👉 *साहित्य—*
 *गाणी , गोष्टी , संवाद यांच्या ध्वनीफित , गोष्टीचे पुस्तक.....*

👉 *कृती —*

🔹 *बडबड गीते , बालगीते  मोबाईलवर ध्वनीफित ऐकविणे.*
🔸 *गोष्टी मोबाईलवर ऐकविणे.*
🔹 *गोष्टी पुस्तकातून वाचून दाखवणे.*
🔸 *वर्गात मुलांना हावभावयुक्त गोष्ट स्वत: सादर करून ऐकविणे.*

👉 *सहभागी वाचन—*

🔹 *सुलभक एक गोष्टीचे पुस्तक सर्वांना दिसेल असे धरतील. पुस्तकातील मुखपृष्ठ , मलपृष्ठ , चिञकार , लेखक , प्रकाशक , पुस्तकाचे नाव इत्यादी  सांगून त्या गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन करून दाखवतील.*

👉 *उद्दिष्टे —*

🎯 *श्रवण कौशल्य विकसित करणे.*
🎯 *लक्षपूर्वक ऐकता येणे.*
🎯  *ध्वनीतील साम्यभेद ओळखणे.*
🎯  *जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लावणे.*
🎯 *ध्वनीचा योग्य उच्चार करण्याची सवय लागते.*
 🎯 *ध्वनीतील सुक्ष्मभेद ओळखता येणे.*

 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬


       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
      💠 *भाषण संभाषण — 1* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत  वाचन  क्षमता विकास  प्रशिक्षण  कार्यक्रम अंर्तगत......*

👉 *साहित्य —*

*मराठी वाचन पेटीतील साहित्य क्रमांक —*

👉 *कृती —*

  🎈  *चिञवर्णन —*

🔹 *एक वस्तू / पक्षी / प्राण्याचे चिञ दाखवून...हे चिञ कशाचे आहे ? असे विचारणे...*
🔸 *एखादी कृती करत असलेले चिञ दाखवून चिञातील व्यक्ती काय करीत आहे ? असे विचारणे*
🔹 *एखादे विविधता असलेले चिञ दाखवून प्रथम चिञाचे वर्णन करून घ्यावे.*

  🎈 *चिञगप्पा—*

🔸 *विविधता असलेले मोठे चिञ दाखवून....चिञात कोण कोण आहेत ? चिञातील मुले काय करीत आहेत ? चिञातील आजोबा काय करीत आहेत ?अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलांशी गप्पा मारणे.*

🎈 *चिञवाचन —*

🔹 *या पूर्वी श्रवणात ऐकविलेल्या गोष्टींच्या चिञ मालिकेचा संच देऊन चिञ क्रमाने लावून गोष्ट सांगायला लावणे.*

👉 *वरील प्रत्येक कृती समुहात , गटात , वैयक्तिक याच क्रमाने घ्यावी.*

👉 *उद्दिष्टे —*

🎯 *निरीक्षण शक्ती वाढते.*
🎯 *गप्पा मारता येणे*
🎯 *मुद्देसूद बोलता येणे.*
🎯 *आत्मविश्वासाने बोलता येणे.*
🎯 *सभाधीटपणा वाढतो.*
🎯 *कल्पना शक्तीला चालना मिळते.*

 📒📕📗📘📙📔📓📒📕📗📘📙
*👉एकच ध्यास,वाचन विकास👈*

*📘मुलभूत वाचन विकास प्रशिक्षण गेवराई-दिवस 3रा/समारोप📘*



*📘प्रत्यक्ष कार्यवाही👉*


📘 *उपस्थिती पञक* 👉 *या मध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी ही कृती करायची आहे.तसेच आपण विविध उपक्रम राबू शकतो*
📙 *चिञकार्ड-शब्दकार्ड👉*
                          *मुलांचे अवधान टिकवण्यासाठी व सलगवाचन सराव घेण्यासाठी ही कृती घेणे महत्वाचे आहे*
📗 *शब्दचक्रे* 👉
                   *एका अक्षरापासून आपल्याला मुलांकडून  विविध शब्द विचारुन शिक्षकांनी चक्रे तयार करायची आहे व त्याचा पुरेपुरे सराव घ्यायचा आहे.*
📓 *चिञे-वाक्य-साचे* 👉
                        *चिञ-वाक्य साच्यावरुन मुलांचा भरपूर सराव घ्यायचा आहे व वाचनाकडे वळवायचे आहे.*
📔 *अक्षर गट तयार करणे* 👉
                    *विविध अक्षर गटापासून विविध शब्द तयार करण्याची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे.*
📒 *अक्षरगटापासुन वाचन पाठ तयार करणे* 👉
        *वयोगटानूसार वाचनपाठ तयार करायचे आहेत व सराव घ्यायचा आहे.*
📗 *बाराखडी व चौदाखडी वाचन* 👉
         *अॅ व आॅ हे दोन अक्षर बाराखडीत वाढले व चौदाखडी तयार झाली .*
📒 *वर्णानुक्रमे शब्द लावणे* 👉
                       *चौदाखडीचे दृढीकरण करण्यासाठी ही कृती महत्वाची आहे.*
📘 *जोडअक्षर वाचन* 👉
                    *या कृतीचे दृढीकरण होण्यासाठी चिञमय उतारे,शब्दडोंगर याचि सराव घेण्यात आले.*
📕 *आदर्श/प्रकट वाचन* 👉
         *प्रकट वाचन वाचावे व विद्यार्थ्यांनी अनुकरणाने आदर्श वाचन करायचे आहे.*

*=======================*


📕 *कृतीआराखडा*

*आपलं मुल वाचनाच्या कोणत्या टप्यात आहे यासाठी हा कृती आराखडा तयार करायचा आहे.*
👍👍👍👍👍👍
👍👍
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
*एक पाऊल वाचनाकडे* 🏃🏽🏃🏽🏃🏽👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦

👍 *वाचनार       रे      वाचनार*

             *100% वाचनार* 👍
*========================*

▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
     ➖🎭Ⓜ💲🅿🎭➖
 ✍🏻 *सौ.अलका राकेश फुलझेले* ✍🏻     
   🏵📚 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल 📚🏵*
 ▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
     
 🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
 ════════════════
       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
   💠 *भाषण संभाषण —1* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत  वाचन  क्षमता विकास  प्रशिक्षण  कार्यक्रम अंर्तगत........*

👉 *कृती — 1*

   🎈 *ओळख — स्वत:ची*

🔹 *प्रथम स्वत:ची ओळख करून द्यायची.उदा.माझे नाव अलका आहे.*
🔸 *प्रत्येकाने आपल्या मिञाची ओळख करून द्यायची. उदा.शोभा माझी मैञिण आहे.तिला शाळा खुप आवडते.*


👉 *कृती — 2*

🎈 *माहिती — कुटुंब , मिञ , परिसर*

🔸 *गटातील प्रत्येकाकडून कुटुंबाची माहिती विचारणे.*
🔹 *गटातील प्रत्येकाकडून मिञाची माहिती विचारणे.*
🔸 *गटातील प्रत्येकाकडून परिसरातील माहिती विचारणे.*

👉 *उद्दिष्टे —*

🎯 *सहज गप्पा मारता येणे.*
🎯 *प्रश्न विचारता येणे.*
🎯 *योग्य गतीने बोलता येणे.*
🎯 *आत्मविश्वास वाढविणे.*
🎯 *वर्गमिञांची ओळख होणे.*

 
   
 ════════════════
       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
      💠 *भाषण संभाषण — 2* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत  वाचन  क्षमता विकास  प्रशिक्षण  कार्यक्रम अंर्तगत......*

👉 *साहित्य —*

*मराठी वाचन पेटीतील साहित्य क्रमांक —*

👉 *कृती —*

  🎈  *चिञवर्णन —*

🔹 *एक वस्तू / पक्षी / प्राण्याचे चिञ दाखवून...हे चिञ कशाचे आहे ? असे विचारणे...*
🔸 *एखादी कृती करत असलेले चिञ दाखवून चिञातील व्यक्ती काय करीत आहे ? असे विचारणे*
🔹 *एखादे विविधता असलेले चिञ दाखवून प्रथम चिञाचे वर्णन करून घ्यावे.*

  🎈 *चिञगप्पा—*

🔸 *विविधता असलेले मोठे चिञ दाखवून....चिञात कोण कोण आहेत ? चिञातील मुले काय करीत आहेत ? चिञातील आजोबा काय करीत आहेत ?अशा प्रकारचे प्रश्न विचारून मुलांशी गप्पा मारणे.*

🎈 *चिञवाचन —*

🔹 *या पूर्वी श्रवणात ऐकविलेल्या गोष्टींच्या चिञ मालिकेचा संच देऊन चिञ क्रमाने लावून गोष्ट सांगायला लावणे.*

👉 *वरील प्रत्येक कृती समुहात , गटात , वैयक्तिक याच क्रमाने घ्यावी.*

👉 *उद्दिष्टे —*

🎯 *निरीक्षण शक्ती वाढते.*
🎯 *गप्पा मारता येणे*
🎯 *मुद्देसूद बोलता येणे.*
🎯 *आत्मविश्वासाने बोलता येणे.*
🎯 *सभाधीटपणा वाढतो.*
🎯 *कल्पना शक्तीला चालना मिळते
     
 🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
 ════════════════
       🔘 *उपक्रमाचे नाव*  🔘
   💠 *भाषण संभाषण —3💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम......*

👉 *कृती — 4*

🎈 *गप्पा —*

  *गप्पांचे दोन प्रकार आहेत.*
*1  ) अनौपचारिक गप्पा*
*2  ) औपचारिक गप्पा*

🔹 *अनौपचारिक गप्पा —*
*ज्या गप्पा आपण सहज मारतो तसेच विषय ठरलेला नसतो त्या गप्पांना अनौपचारिक गप्पा म्हणतात.*
*उदा. दोन स्ञिया भेटल्यावर गप्पा मारतात.*

🔸 *औपचारिक गप्पा —*

*विषय ठरवलेला असतो.त्या विषयाला अनुसरून ज्या गप्पा मारल्या जातात त्याला औपचारिक गप्पा असे म्हणतात.*
*उदा.झाड ,दगड असे विषय देऊन या विषयावर बोला.*

👉 *सुचना—*

 *विषय ठरवून गप्पा मारतांना शिक्षकांनी वर्गीकरण / विभाग होतील असे प्रश्न विचारून त्या गप्पांना योग्य दिशा द्यावी.*

🔹 *उदा.— 1 ) झाड या विषयावर गप्पा मारतांना.... झाड कशाचे आहे ? झाडाचे उपयोग ?*
🔸 *उदा — 2 ) दगड या विषयावर गप्पा मारतांना दगडाचा आकार कसा आहे ? दगडाचा उपयोग ?*
👉 *उद्दिष्टे —*

🎯 *अनौपचारिक व औपचारिक गप्पा मारता येणे.*
🎯 *स्व अभिव्यक्तीला वाव मिळतो.*
🎯 *आत्मविश्वास वाढतो.*
🎯 *मुद्देसूद बोलता येणे.*
🎯 *योग्य गतीने बोलता येणे.*
🎯 *चौकस वृत्ती वाढते.*
🎯 *योग्य आरोह—अवरोहासह बोलता येणे.*

 
 ════════════════
         🔘 *उपक्रमाचे नाव*  🔘
       💠  *कृतीयुक्त गाणी* 💠

💃 🕺 *चाळणीतल पीठ*    💃🕺
━━━━━━━━━━━━━━━━
   *100  % मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत......*

 *चाळणीतल पीठ म्हणे....२ वेळा*
 *चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट.....*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट....*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ  मला नीट....*

🎤 *कोपर्‍यातली काठी........२वेळा*
*कोपर्‍यातली काठी म्हणे लागेन मी पाठी....*
*लागेन मी पाठी म्हणे , लागेन मी पाठी...*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*

 🎤 *पावसातला वारा......... २ वेळा*
*पावसातला वारा म्हणे , गारा वेच गारा...*
*गारा वेच गारा म्हणे , गारा वेच गारा...*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*

 🎤 *कढईतली पुरी.....२ वेळा*
*कढईतली पुरी म्हणे , किती मी गोरी*
*किती मी गोरी म्हणे , किती मी गोरी....*
*चाळणीतल पीठ म्हणे , चाळ मला नीट...*
*चाळ मला नीट म्हणे , चाळ मला नीट...*

     
   ════════════════

     🔘  *उपक्रमाचे नाव*  🔘
        💠  *कृतीयुक्त गीत*  💠
     🎈  *गंपूने केले साबनाचे फुगे* 🎈━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण अंर्तगत.....*


🎈 *गंपूने केले साबनाचे फुगे.....२ वेळा*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे.....२ वेळा*

🎈 *एक फुगा...आ..हा..हा...एक फुगा...*
*एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला...*
*गंपूला तो डोळाच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे....२वेळा*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे.... २ वेळा*

🎈 *एक फुगा... आ...हा...हा..२ वेळा*
*एक फुगा ताईच्या वेणीवर बसला..*
*गंपूला तो मोतीच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे...२वेळा*
*छोटे गेले पुढे नी..मोठे राहिले मागे..२ वेळा*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा..*
*एक फुगा दादाच्या बॅटवर बसला...*
*गंपूला तो चेंडूच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे....*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे..*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा..*
*एक फुगा आजीच्या हातावर बसला...*
*गंपूला तो लाडूच वाटला....*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे...*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा*
*एक फुगा आईच्या गालावर बसला....*
*गंपूला तो पापाच वाटला....*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी मोठे राहिले मागे..*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा...*
*एक फुगा उडत उडत आकाशात गेला..*
*गंपूला तो सूर्यच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी मोठे राहिले मागे...*

 
━━━━━━━━━━━━━━━━
👉 *100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण अंर्तगत उपक्रम.....*

       🔘 *उपक्रमाचे नाव*  🔘
      💠 *कृतीयुक्त गाणी* 💠
       🚂  *दख्खनची राणी*  🚂
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत.......*


🚆 *दख्खनची  ग  राणी  मला मुंबईला जायचयं.......... २ वेळा*
*झुकूझुकू  झुकूझुकू  मला मुंबईला  जायचयं........२वेळा*
*बटाट्याचा वडा मला चाखून बघायचाय..*
*गारगार सरबत मला पिऊन बघायचय.....॥१॥*

 🚆 *दख्खनची  ग  राणी  मला मुंबईला  जायचयं........२ वेळा*
*झुकूझुकू  झुकूझुकू  मला मुंबईला   जायचयं.........२ वेळा*
*लोणावळ्याची चिक्की मला खाऊन बघायची..*
*उंच उंच बिल्डिंग मला जवळून बघायची.....॥२॥*

🚆 *दख्खनची  ग  राणी  मला मुंबईला  जायचयं........२ वेळा*
*झुकूझुकू  झुकूझुकू  मला  मुंबईला जायचय.........२ वेळा*
*वाघ , सिंह , हत्ती मला जवळून बघायचेय*
*घोडा गाडीत बसून मला रपेट मारायची....॥३॥*

🚆 *दख्खनची  ग  राणी  मला मुंबईला  जायचयं......२ वेळा*
*झुकूझुकू  झुकूझुकू  मला  मुंबईला   जायचयं.......२ वेळा*
*समुद्राच्या लाटांमध्ये मला भिजायचयं...*
*मऊ मऊ लाटांमध्ये मला खेळायचयं...॥४॥*

   
   ════════════════


       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
    💠 *बोलीभाषेतील कृतीगीत* 💠
      🌸 *रानाच फुल* 🌸
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन विकास क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत....*

🌸 *गेलो होतो , गेलो होतो रानाला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो रानाला......*
*हे....रानाच फुल माझ्या कानाला रे....*
*रानाच फुल माझ्या कानाला....॥ १ ॥*

🥀 *गेलो होतो , गेलो होतो भेंडीला रे....*
*गेलो होतो , गेलो होतो भेंडीला......*
*हे....भेंडीच फुल माझ्या शेंडीला रे......*
*भेंडीच फुल माझ्या शेंडीला....॥ २ ॥*

🌾 *गेलो होतो , गेलो होतो भाताला रे.......*
*गेलो होतो , गेलो होतो भाताला...*
*हे...भाताच फुल माझ्या हाताला रे.........*
*भाताच  फुल माझ्या हाताला....॥ ३ ॥*

🌺 *गेलो होतो , गेलो होतो वास्ट्याला रे.....*
*गेलो होतो , गेलो होतो  वास्ट्याला.....*
*हे...वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे.....*
*वास्ट्याच फुल माझ्या कास्ट्याला रे...॥ ४ ॥*



 ════════════════
       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
     💠 *कृतीयुक्त गीत*  💠
          *यमुनेच्या तिरी......*
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंर्तगत.........*

 🦅 *यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील , बुलबुल असतील , बुलबुल असतील ..हो..*sss
*एक तरी , दोन तरी , तीन तरी असतील हो....*sss
*चार तरी , पाच तरी , सहा तरी असतील हो....*sss
*सात तरी , आठ तरी , नऊ तरी असतील हो....*sss
*दहा तरी असतील हो........*ssss
*यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील , बुलबुल असतील ,बुलबुल  असतील..हो..*sss

🦅 *दहा तरी , नऊ तरी , आठ तरी असतील हो...*sss
*सात तरी , आठ तरी , सहा तरी असतील हो...*
*पाच तरी , तीन तरी , दोन तरी असतील हो....*
*एक तरी असतील हो.........*sss
*यमुनेच्या तिरी किती बुलबुल असतील ,बुलबुल असतील , बुलबुल असतील...हो..*sss     

    ══════════════








*जूनी वर्तमान पञे ( कागद )*

👉 *कृती—  १.....*

💠 *पाच पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करणे.*
💠 *गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला चार चार कागद द्यावे.*
💠 *पहिला कागद विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे फाडण्यास सांगणे.*
💠 *दुसरा कागद दोन्ही हातांच्या दोन बोटांनी फाडण्यास सांगणे.*
💠 *तिसरा कागद दोन्ही हातांच्या दोन बोटांनी चिमटीत पकडून सरळ रेषेत फाडण्यास सांगणे.*
💠 *चौथा कागद मधोमध घडी घालून घडीवर दोन बोटांनी चिमटीत पकडून फाडण्यास सांगणे.*

 👉 *कृती—  २.....*
     *कागद चुरगळणे*

💠 *विद्यार्थ्यांना फाडलेले सर्व कागद एकञ करून दोन हाताने चुरगळण्यास सांगावे.*
💠 *नंतर विद्यार्थ्यांना एका हाताने चुरगळण्यास सांगावे.*
💠 *कागद चुरगळून चेंडू तयार करण्यास सांगणे.*
💠 *एका हाताने फेकून दुसर्‍या हाताने झेलण्यास सांगणे.*

👉 *उद्यिष्ट —*

🎯 *हस्तनेञ समन्वय साधता येणे.*
🎯 *एकाग्रता व बैठक  वाढविणे.*
🎯 *अचूक अंदाज बांधता येणे.*
🎯 *विद्यार्थ्यांना आनंद देणे.*
🎯 *खेळातुन शिक्षण हा हेतू साधणे.*

   ════════════════


      🔘 *उपक्रमाचे नाव*  🔘
   🗣👂🏻 *कानमंञ*  🗣👂🏻
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मुलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण अंतर्गत......*

  👉 *कृती —*

🔹 *वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अर्ध गोलाकार उभे करावे.*
🔸 *सुलभक एका विद्यार्थ्याला  वर्गाच्या बाहेर नेऊन मोठ्या आवाजात एक वाक्य सांगतील.*
🔹 *त्या विद्यार्थ्याने ते वाक्य बरोबर ऐकले की नाही म्हणून सुलभक त्याच्याकडून वाक्य बोलून घेतील.*
🔸 *तो विद्यार्थी वर्गात  गोलात उभ्या असलेल्या पहिल्या विद्यार्थ्याच्या कानात वाक्य हळूच सांगतो.*
🔹 *अशाक्रारे गोलात उभे असलेले विद्यार्थी बाजुच्या विद्यार्थ्याच्या कानात वाक्य सांगतील.*
🔸 *शेवटचा विद्यार्थी मोठ्याने ते वाक्य सर्वांना सांगेल.*
🔹 *पहिला विद्यार्थी  व सुलभक शेवटच्या विद्यार्थ्याने सांगीतलेले वाक्य बरोबर आहे किंवा नाही याचा पडताळा करतील.*
🔸 *अशाप्रकारे हा खेळ वर्गात घ्यावा.*

👉 *फलनिष्पत्ती—*

🎯 *श्रवण कौशल्य विकसित करणे.*
🎯 *लक्षपूर्वक ऐकणे*
🎯 *जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लागणे.*
🎯 *ध्वनीतील साम्यभेद ओळखणे.*

   ════════════════



        🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
     💠 *शिक्षणपूरक कृती — 2* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण अंतर्गत उपक्रम....*

👉 *साहित्य—*
*भुईमुगाच्या शेंगा , डाळ तांदूळ*

👉 *कृती  — 1*

🔹 *चार ते पाच विद्यार्थ्यांचा गट तयार करणे.*
🔸 *गटात भुईमुगाच्या शेंगा देऊन दोन बोटांच्या चिमटीत पकडून शेंगा फोडण्यास सांगणे.*
🔹 *फोडलेल्या शेंगाच्या टरफलापासून कलाकृती तयार करण्यास सांगणे.*
🔸 *शेवटी शेंगदाणे व गुळ  विद्यार्थ्यांना खायला देणे.*

 👉 *कृती — 2*

    ♻ *डाळ तांदूळ निवडणे.* ♻

🔹 *डाळ व तांदूळ एकञ करून तर्जनीच्या साह्याने वेगळे करण्यास सांगणे.*
🔸 *तर्जनीचा वापर करून डाळ तांदूळ वेगळे करतील याकडे लक्ष द्यावे.*

👉 *उद्दिष्टे —*

🎯 *हस्तनेञ समन्वय साधणे.*
🎯 *एकसंघ काम करणे.*
🎯 *बैठक व एकाग्रता येणे.*
🎯 *सृजनशीलता व जिज्ञासा निर्माण करणे.*
   ════════════════


       🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
💠 *शिक्षणपूरक कृती — 1*  💠
━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन विकास प्रशिक्षण अंर्तगत.......*

👉 *साहित्य —*
*सायकलचे टायर , सागरगोट्या , बांगड्यांचे तुकडे , खापर , रांगोळी , लगोर्‍या चेंडू , गोट्या , विटी दांडू.........*

👉 *कृती—*

🔹 *टायर फिरवणे—*
*सायकलचे टायर देऊन हाताने सरळ रेषेत फिरवायला लावणे.*

🔸 *सागरगोट्या —*
*गटात पाच पाच विद्यार्थ्यांना बसवून सागरगोट्या खेळाची कृती दाखवून त्याप्रमाणे खेळ घ्यावा.*

🔹 *काचकवड्या —*
*काचेच्या बांगड्यांचे तुकडे देऊन खेळाची कृती दाखवून खेळ घ्यावा.*

🔸 *जिबल्या—*
*वर्गात फरशीवर घरे आखून एक खापरीचा किंवा फरशीचा तुकडा घेऊन खेळाची कृती दाखवून खेळ घ्यावा.*

🔹 *काचपूरणी—*
*पाच पाच विद्यार्थ्यांना गटात बसवून त्यांना रांगोळीत बांगडीचा तुकडा बोलता बोलता न कळत लपवून ठेऊन तो तुकडा शोधायला लावणे.*

🔸  *लगोरी—*
 *लगोरी खेळाची कृती दाखवून त्याप्रमाणे खेळ घ्यावा.*

🔹 *गोट्या —*
*गोट्या खेळात नेम धरून कसे मारायचे कृती दाखवून सराव घ्यावा.*

🔸 *विटीदांडू —*
*या खेळासाठी मैदानावर मुलांना नेऊन खेळाची कृती दाखवून खेळ घ्यावा.*

🔹 *आंधळी कोशिंबीर—*
*एका विद्यार्थ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून खेळ समजावून त्याप्रमाणे खेळ घ्यावा.*


👉  *उद्दिष्ट—*
🎯 *निरीक्षण करणे.*
🎯 *निर्णय क्षमतेत वाढ होते.*
🎯 *तर्क लावता येणे.*
🎯 *अचूक अंदाज बांधता येणे.*
🎯 *अचूक कृती करता येणे.*
🎯 *शरीराचा तोल सांभाळता येणे.*
🎯 *एकाग्रता वाढविणे.*
🎯 *हस्तनेञ समन्वय साधता येणे.*
🎯 *सर्जनशीलता व जिज्ञासा निर्माण करणे.*

 ═══════════════

        🔘 *उपक्रमाचे नाव* 🔘
💠 *शिक्षणपूरक कृती — 2* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
👉 *साहित्य — रिकाम्या डब्या ,वास , चव ,ध्वनी , स्पर्श यासाठीचे साहित्य....*

👉 *कार्यवाही—*

👉 *वास —*
🔹  *कृती—*
*१ ) सहा रिकाम्या डब्यात हळद , हिंग , ओवा , सुगंधी द्रव्य ,लसून ,मसाला भरून ठेवणे.*
*२ ) विद्यार्थ्यांना प्रत्येक डबी मधील वास घेण्यास सांगणे.*
*३ ) विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून प्रत्येक डबी मधील वास घेऊन वास ओळखण्यास सांगणे.*

👉 *चव —*
🔸 *कृती—*
*१ ) सहा रिकाम्या डब्यात चिंच तुरटी ,साखर , मेथी , मीठ , खडी साखर ठेवणे.*
*२ ) विद्यार्थ्यांना डबी मधील पदार्थांची प्रत्यक्ष चव देऊन अनुभव घेऊ द्यावा.*
*३ ) नंतर डोळ्यावर पट्टी बांधून प्रत्येक डबी मधील पदार्थ चिभेवर ठेऊन चव ओळखण्यास सांगणे.*

👉 *ध्वनी—*
🔹 *कृती—*
*१ ) सहा रिकाम्या डब्यात शाबुदाणा , घुंगरू , नाणी , शेंगदाणे , दगड , चाव्यांचा गुच्छ ठेवणे.*
*२ ) विद्यार्थ्यांना डबीतील आवाज ऐकविणे.*
*३ ) विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर
पट्टी बांधून डबी मधील आवाज ऐकवूण ओळखण्यास सांगणे.*

👉 *स्पर्श —*
🔹 *कृती—*
*१ ) स्पंज , रेशमी कपडा , कापूस , सॅन्ड पेपर ( Sand Paper ) , लाकूड इत्यादी वस्तुंचा स्पर्श करून नाव विचारणे.*
*२ ) नंतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून हातात वस्तु देऊन स्पर्श कशाचा विचारणे.*

👉 *प्राणी , पक्षी ,वाहणे यांचे आवाज ऐकविणे व ओळखणे —*
🔹 *कृती —*
*१ ) मोबाईलवर प्राणी , पक्षी व वाहने यांचे आवाज डाऊनलोड करून घ्यावे.*
*२ )  प्राणी , पक्षी व वाहने यांचे आवाज प्रथम ऐकविणे व ओळखण्यास सांगणे.*

👉 *उद्दिष्टे—*

🎯 *ज्ञानेंद्रियांचा विकास करणे.*
🎯 *अचूक अंदाज बांधता येणे.*
🎯 *सृजनशीलता व जिज्ञासा निर्माण करणे.*
🎯 *पटकन निर्णय घेता येणे.*
🎯 *बैठक व एकाग्रता वाढविणे.*
🎯 *लक्षपूर्वक आवाज ऐकणे.*
🎯 *ध्वनीतील साम्यभेद ओळखणे.*
🎯 *श्रवण कौशल्य विकसित करणे.*
🎯 *जाणीवपूर्वक ऐकण्याची सवय लावणे.*

     
 ════════════════
 🌹🖊🕉🇮🇳: कृतीयुक्त गीते--

*१)एक फुगा अहा एक फुगा*

गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2

एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......

एक फुगा आजीच्या गालावर बसला 
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....

एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ....


२)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर 

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी 
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी 
आरसा त्याला उलटे करी
     गुरुजी छडी नका मारुजी



🌹🖊🕉🇮🇳: 

३)उरात होतय धडधड
पाटी पूस्तक हातात आलि
अंगात भरलय वार
शाळेची घंटा झाली
अता अधिर झालोया
मग तयार झालोया
पाटि दप्तर घेवून शाळेत आलोया
वाचतय बूंगाट लिहतय झिंगाट 
रंगात आलोया 
वाचलय 

झिंगझिंग झिंग झिंगाट

झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग 

समद्या शाळेला झालि 
माझ्या वाचनाचि घाई |२
कधि येणार हो बाई 
माला आ ,म्हणजे आई 
अता खेळून आलोया
लई वाचून आलोया
दूरून माळा वरून 
तूमच्या शाळेत आलोया 
ढिंच्याक जोरात 
डिजिटल वर्गात 
वाचाया आलोया 
वाचलय 
झिंग झिंग झिंग झिंगाट 
झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंगाट 
झिंग झिंग झिंग


अता उताविळ झालो 
चित्र पाहून रंगलो
श्बद वाचून दंगलो
पट्य्या वाचून हसलो 

अता तयार झालोया 
तूमच्या वर्गात आलोया 

लई खेळून वाचून या वर्गात आलूया

समद्या पोरात म्या लई जोरात वाचून आलोया 

वाचल झिंग झिंग झिंगाट ......
...........,झिंग झिंग झिंग।।

🌹🖊🕉🇮🇳: *👩‍⚖👩

४)‍⚖सुंदरा👩‍⚖👩‍⚖* 
➖➖➖➖➖➖➖
सुंदरा शाळेला येशील काय 

मला शर्ट पण नाही
 मला स्कर्ट पण नाही 
मी कशी येऊ शाळेला ll 1ll 

मला पुस्तक पण नाही 
मला दप्तर पण नाही 
मी कशी येऊ शाळेला ll2ll 

मला पेन पण नाही 
मला पेंसिल पण नाही 
मी कशी येऊ शाळेला ll 3ll

तुला शर्ट पण देईल 
तुला स्कर्ट पण देईल 
तुला पुस्तक पण देईल 
तुला दप्तरपण देईल 
तुला पेन पण देईल 
तुला पेंसिल पण देईल 

तु येणार का शाळेला 
सुंदरा शाळेला येशील का 

मी येणार शाळेला ॥



🌹🖊🕉🇮🇳: 
" मूलभूत वाचन क्षमता विकास प्रशिक्षण" घेऊन उत्तम 'सुलभक' म्हणून तयार झालेल्या गुरुजींनी मुलांना शिकवल्यानंतर मुलांमध्ये आत्मविश्‍वास आला आणि...

*"वाचणार रे वाचणार 100% वाचणार"* 

हे मुलाच्या बाबतीत साध्य झाल्यामुळे आत्मविश्वास आलेला मुलगा गुरुजींना म्हणतो 
*"द्या हो गुरुजी पुस्तक,वाचून दाखवतो खडखडा"* .
 हा आत्मविश्वास मुलाच्या मनात निर्माण झालेला आहे आणि तो या '

 *प्रेरणा गीतातून*  गुरुजींना मुलगा सांगत आहे.

       ५) *प्रेरणा गीत*

*द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून*
*दाखवतो खडखडा*

कागद फाडून चेंडू केले,
वास,रंग,चव ओळखू आले
ध्वनी डबीतील चुकलो नाही
वर्णन, गप्पा, संवाद झाले
अशा 'गुरु'ची वाट झाडतो
हाती घेऊन फडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥१॥

पूर्वी वाचन चुकत होतो,
काना मात्रा हुकत होतो
गुरुजींच्याही 'शाब्बास'किला
नेहमी नेहमी मुकत होतो
कृती करुनी हुशार झालो 
भरलाय ज्ञानाचा घडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥2॥

गप्पा,गोष्टी,गाणी,कोडी
साम्य-भेद चित्रांची गाडी
बसल्या बसल्या जोडू शकतो
समान अक्षरांची जोडी
'व' चे शब्द सांगू का मी?
लिहा फळ्यावर 'वडा'
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥३॥

'वाचन पाठ' मी वाचू शकतो
गाणी म्हणत नाचू शकतो
वाचन धेयापर्यंत आता,
न थांबता मी पोहचू शकतो
येऊ द्या साहेब,घेऊ द्या पुस्तक,
देऊ द्या कुठलाही धडा
द्या हो गुरूजी पुस्तक,वाचून
दाखवतो खडखडा.               ॥४॥

🌹🖊🕉🇮🇳: 
६)*शरीराची ओळख*

ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या 

हात पुढे करा
अंगठा आत घ्या 
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या 

हात पुढे करा
अंगठा आत घ्या 
कोपरे दाखवा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या 

हात पुढे करा
अंगठा आत घ्या 
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या 

हात पुढे करा
अंगठा आत घ्या 
कोपरे दाखवा
मान वाकडी करा
गुडघ्यात वाका
ला ल ल ला ला ल ल ला
चला शरीराची ओळख करू या 




७) वाचनगीत

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार ।।

 कागद तूम्ही फाडा नि जिबल्याही खेळा
कोलांटी उठल्या नि टायरही खेळा
तूम्हा कूणी नाही रोखणार
की शंभर टक्के आता वाचणार।।


उशीरा सुचली पण बाई छान युक्ती
नेहमीसारखी अभ्यासाची नाही हो सक्ती
आता रोज आम्ही शाळेत येणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

घरी जे खेळ तेच शाळेतही
 आले
गुपचूप बसणारे मुलंही बोलके झाले
चित्रावरून गोष्ट सांगणार।।
की शंभर टक्के आता वाचणार 

अंकांची गाडी नि शब्दांचा डोंगर
चित्रगप्पा ,नाटुकली मज्जा कित्ती येणार 
त्यातुनच आता शिकणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आणि घर आता सारखेच वाटे
बाई गुरुजींशी वाटे बदललेत नाते
आत्मविश्वास आता वाढणार ।।
की शंभर टक्के आता वाचणार

शाळा आता पुर्वीसारखी अजिबात नाही
माझ्यासाठी तिथे आता आहे खूप काही
प्रेम आणि माझा सन्मान ।।
की शंभर टक्के आता वाचणार

आजवर जे आमच्यासाठी होतं मोठं कोडं
वाचन विकास कार्यक्रम ने 
सारं केलं  सोप्पं ।।
वाटे किती मानावे आभार।।
की शंभर टक्के आता वाचणार

एकच ध्यास वाचन विकास
की शंभर टक्के आता वाचणार.


    ८)शब्द वाढविण्याचे गाणे🌴*

*🌴🌴एक होता डोंगर...🌴🌴*

एक होता डोंगर...डोंगरावर झाड...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.....*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडं...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानांत खोपा...खोप्यात अंडंं...अंड्यात पिल्लू...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंड...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...हिरवळ बाजूलाच होती,हिरवळ बाजूला......*
एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला.......
*एक होता डोंगर...डोंगरावर झाड...झाडाला खोड...खोडाला फांद्या...फांद्याला पानं...पानात खोपा...खोप्यात अंडं...अंड्यात पिल्लू...पिल्लाला चोच...चोचित दाणा...दाणा झाला चूर्रर्र...चिमणी उडाली भूर्रर्र....हिरवळ बाजूलाच होती, हिरवळ बाजूला..........*

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

🌹🖊🕉🇮🇳: 

९)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर 

औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी 
        गुरुजी छडी नका

शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी 
आरसा त्याला उलटे करी
  गुरुजी छडी नका मारुजी...

🌹🖊🕉🇮🇳: 

१०)*अंगनात माझ्या मोरियो आला..*

अंगनात माझ्या मोरियो आला-२
मोर म्हणून बोलावितो..2
मोरियो घुंगरू वजवितो...2
हातातले कंगन दे मला आई
कंगन म्हणून बोलावितो
मोरियो....।।1।।
नाकातली नथनी दे मला आई
नथनी म्हणून बोलावितो
मोरियो...।।2।।
पायातली पैंजन दे मला आई
पैंजन म्हणून बोलावितो
मोरियो...।।3।।
कानातली बुगड़ी दे मला आई
बुगड़ी म्हणून बोलावितो
मोरियो...।।4।।
मोरियो घुंगरू वजवितो.....


११)पोर तुनी शाळा मा*

पोर तुनी शाळा मा धाड़ रे दादा
पोर तुनी शाळा मा धाड़...2
भाषा विषय ना तास भी शे ना..2
क ख ग घ शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी....।।1।।
गणित विषय ना तास भी शे ना-२
एक दोन तीन चार शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।2।
इंग्लिश विषय ना तास भी शे ना-
A B C D शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी...।।3।।
कला विषय ना तास भी शे ना-२
गाना नि गोष्टी शिकिले दादा
पोर तुनी शाळा मा धाड़.
पोर तुनी ...।।4।।


 १२)गंपुने केले साबनाचे फुगे*

गंपुने केले साबनाचे फुगे
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे
एक फुगा अहा एक फुगा -2
एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपुला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।1।।
एक फुगा आजीच्या हातावर बसला 
गंपुला तो लाडुच वाटला
एक फुगा अहा एक फुगा  -।।2।।
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंपुला तो मोतीच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।3।।
एक फुगा आईच्या गालावर बसला
गंपुला तो पापाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा -।।4।।


[१३)गुरूजी छड़ी नका मारु*

गुरूजी छड़ी नका मारु जी नि   लगाते हातावारी-२
शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरूजी
गुरूजी छड़ी....।।1।।
आवंदाच ग वारिस बाई मी
सहाव गाठलं ग
शिकन्यासाठी पहिलं पाऊल
शाळेत मी टाकलं ग
येतंय रडू मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरूजी छड़ी.....।।2।।
शब्द वाचता वाचता माझी
मान दुखू लागलीं ग
अंक लिहिता लिहिता माझी
बोटं दुखू लागलीं ग
उलटे अक्षर काढले जरी
अरसा त्याला सुलटे करी    गुरूजी छड़ी....।।3।।

🌹🖊🕉🇮🇳: 

१४)*झिंगाट reading song*

उरात होतय धड़धड़ 
पाटी पुस्तक हातात आली
अंगात भरलय वारं 
अन शाळेची घंटा झाली
आता अधीर झालोया
 मग तायार झालोया
पाटी दप्तर घेऊन तुमच्या 
शाळेत आलोय
वाचतंय गूँगाट लिहितय झिंगाट
रंगात आलोया झालंय 
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
संद्या शाळेला झालिय 
माझ्या वाचनाची घाई
कधी येणार हो बाईं मला
आई चा अ आ ई
आता खेळुन आलोया
लई वाचून आलोया
ढिंगच्याक जोरात डिजिटल वर्गात
शिकायला आलोया झालं
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
बाई उताविळ झालो
चित्र पाहुन दंगलो 
शब्द वाचून दंगलों
पट्टया वाचून हसलो
आता तयार झालोया 
तुमच्या वर्गात आलोया
लई खेळून वाचून वर्गामध्ये
पहिला आलोया
संद्या पोरात म्या लई जोरात
रंगात आलोया झाल
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट 

🌹🖊🕉🇮🇳: 

*१५)शाळा मा चाल मना नातुबा*

शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा 
शाळा मा चाल मना....
तू पाटी नि पुस्तक भर 
धर दप्तर खांदावर 
चाल शाळा ना रस्ता धर
तुनी शाळा शे रस्त्यावर ।।1।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा 
शाळा मा चाल मना....
तू वाचन शिकी ले रं 
थोडं लेखन शिकी ले रं
तू गणित शिकना जर
पुढे जाईन आपलं घर ।।2।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा 
शाळा मा चाल मना....
थोड़ सोताना करता कर
थोड़ समाज ना करता कर
जो शिक्षण लेस खरं
त्यानं जीवन शे सुंदर ।।3।।
शाळा मा चाल मना नातुबा
शाळा मा चाल मना नातुबा
नातुबा ,नातुबा ,नातुबा रे नातुबा 
शाळा मा चाल मना....
              *स्वयंरचित*
🌹🖊🕉🇮🇳: 

१६)नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू,
येउ दे ग गालात खुदकन हसू |

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग,
देऊ काय तुला हवे ते ग माग,
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू,
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू,
नवीन कपड्यात छान छान दिसू |

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट,
केशरीभात केला आहे मोठा थाट,
ओठात आले बाई लडिवाळ हसू |

🌹🖊🕉🇮🇳: 

१७)किलबिल किलबिल पक्षी बोलती, 
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती, 
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही, 
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी, 
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे, 
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती, 
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा, 
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो, 
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती, 
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती, 
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते, 
उणे न कोठे काही
🌹🖊🕉:

१८)सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
🌹🖊🕉🇮🇳: 

१९)रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यू ढिश्यू ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो

आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?
🌹🖊🕉🇮🇳: 

२०)चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?

निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?

आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.

असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला?
दिसता दिसता गडप झाला.

हाकेला 'ओ' माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
🌹🖊🕉🇮🇳:

२१) ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !
🌹🖊🕉🇮🇳: 

२२)अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ.

थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम.

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार.

डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव.
🌹🖊🕉🇮🇳: 

२३)नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
🌹🖊🕉🇮🇳: 

२४)येरे येरे पावसा
तुला देतो पैसा.

पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा.

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी.

सर आली धावून
मडके गेले वाहून.
🌹🖊🕉🇮🇳: 

२५)ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा..
🌹🖊🕉🇮🇳: 

२६)अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरि खट्याळ तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई.
🌹🖊🕉🇮🇳:

२७) गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

🌹🖊🕉🇮🇳

२८)ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे.

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे.

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल्‌ ते होऊ दे.
🌹🖊🕉🇮🇳: 

२९)राजा राणीची नको काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची

राम हसायचा कसा राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी
सोबत तिथे त्याला होती का कोणाची
🌹🖊🕉🇮🇳: 

३०)छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा !' 'गोप्या गद्ध्या !' देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा पुसती गिरवा बघु नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌
🌹🖊🕉🇮🇳: 

३१)गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !

🌹🖊🕉🇮🇳:

३२) झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

🌹🖊🕉🇮🇳: 

३३)असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

🌹🖊🕉🇮🇳: 

३४)ससेभाऊ ससेभाऊ
चार उडया मारा पाहू 
कश्या  कश्या कश्या?
अश्या अश्या अश्या

अहो  अहो हत्ती
डुलडुलता  किती

कसे कसे कसे?
असे असे असे!

अहो अहो गाढवदादा 
जरा तुमचा सुर काढा
कसा कसा कसा
असा असा असा


होँ... हो... होँ

🌹🖊🕉🇮🇳: 

३५)लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
टूक टूक ही बघते  

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते 
दात कधी घाशिना 
अंग कधी धुविना 

इवले घरकुल मांडते 
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या करपून गेल्या  
भात केला कच्चा झाला
वरण केल पात्तळ झाल
तूप सगळ सांडून गेल 

केळ्याच शिकरण करायला गेली  
पडली खुर्चीतच 
आडाच पाणी काढायला गेली
धपकन पडली आत

🌹🖊🕉🇮🇳: 

३६)फिरायला गेला बोकड
धावत आले माकड

दोघे गेले हॉटेलात 
बसून खाला मटारभात

मालक म्हणतो द्या पैसे 
दोघांनी मिळून दिले ठोसे

माकडाने मारली उडी
पटकन पळवली सुपारीची पुडी 

दोघे गेले सुपारी खात
मालक बसला चोळत हात.

🌹🖊🕉🇮🇳: 

३७)काव काव काव काव कावळा म्हणाला 
सोनुच्या घरी आला 
चिव चिव चिव चिव चिमणी म्हणाली
सोनुच्या घरी आली 
भू भू भू भू कुत्रा म्हणाला
सोनुच्या घरी आला 
म्याव म्याव म्याव म्याव मांजर म्हणाली
सोनुच्या घरी आली
मिठू मिठू मिठू मिठू पोपट म्हणाला 
सोनुच्या घरी आला
कुहू कुहू कुहू कुहू कोकिला म्हणाली
सोनुच्या घरी आली 
डराव डराव डराव डराव बेडूक म्हणाला
सोनुच्या घरी आला
कुँक्क कुँक्क कुँक्क कुँक्क बदक म्हणाले 
सोनुच्या घरी आले


🌹🖊🕉🇮🇳: 

३८)सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई, थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता पण रे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्‍नाला !
आवडती रे वडिल मला !

👉    📱📕✏📚
*सुंदरा या गीताचे बोलीभाषा 
(पावरी) अनुवादंन*
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

३९) बबली शाळा मा चाल तू ..!2!

तह पाटी आप ,तह पुस्तक आप
तह पेन आप ,तह वही आप...
तू शाळा मा काह नि आवतली...
बबली शाळा मा चाल तू....!!2!!

तह फरक आप ,तह डगल आप 
तह दफतर आप,तह पैयहा आप
तू शाळा मा काह नि आवतली..
बबली शाळा मा चाल तू.....!!2!!

तह कुदरी आप ,तह बिस्कीट आप
तह सहलीक लिजाम, तह किल्ला देखाड
तू शाळा मा काह नि आवतली ...
बबली शाळा मा चाल तू..!!2!!

मास्तर मी शाळा मा आविही ...
मेहेक पाटी बी आप,मेहेक पुस्तक बी आप
मेहेक पेन बी आप,मेहेक पेन्सिल बी आप
मेहेक फरक बी आप, मेहेक डगल बी आप
मेहक दफतर बी आप,मेहेक पैसा बी आप
मेहक कुदरी बी आप, मेहक बिस्कीट बी आप 
मास्तर मी शाळा मा आविही..!!2!!


🌹🖊🕉🇮🇳: 
ही गाणी कालबाह्य होऊ नयेत म्हणून सागळ्यांसाठी उपलब्ध करूँ देण्याचा प्रयत्न केला.

1 comment: