🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
*शैक्षणिक उपक्रम-1
🐍 *शब्द सापशिडी* 🐍
👉 *साहित्य—*
*चार्ट पेपर ,थर्माकोल , प्लॅस्टिक पेपर , सोंगटी , फासा.....*
👉 *कृती—*
🔹 *प्रथम चार्ट पेपर वर पट्टीच्या साह्याने 100 सारखे रकाने काढून घ्यावे.*
🔸 *प्रत्येक रकान्यात 1 ते 100 अंक लिहून सापाची व शिडीची चिञे काढून घ्यावी.*
🔹 *काही रकान्यात स्वरचिन्हासहित अक्षरे लिहावी तर काही रकान्यात प्राणी , पक्षी यांची चिञे लावावी.*
🔸 *चार्ट पेपर थर्माकोल वर चिकटवून प्लॅस्टिक कव्हर लावावे.*
👉 *कार्यवाही—*
🔹 *चार विद्यार्थी एका वेळेस खेळ खेळू शकतात.*
🔸 *1 या अंकावर सोंगटी ठेऊन फासा टाकून खेळाची सुरूवात करतील.*
🔹 *अक्षरावर सोंगटी आल्यास त्या अक्षरापासून शब्द सांगावा.*
🔸 *प्राणी व पक्षी यांच्या चिञावर सोंगटी आल्यास त्यांची नावे व माहिती सांगावी.*
🔹 *सोंगटी शिडीवर आल्यास वर चढावे व सापाच्या तोंडावर आल्यास खाली शेपटीपर्यंत उतरावे.*
🔸 *अशाप्रकारे जो प्रथम 100 या अंकावर पोहचणार तो विजेता.*
👉 *फलश्रुती—*
🔹 *शब्दसंपत्तीत वाढ होते.*
🔸 *प्राणी व पक्षी यांची नावे व माहिती सांगतात.*
🔸 *खेळातुन भाषा विषय शिकतात.*
🔹 *विद्यार्थी आनंदाने खेळातून शिकतात.*
🔸 *दप्तरावीना शाळा या उपक्रमासाठी वरील साहित्य अतिशय उपयुक्त आहे.*
*============================
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
उपक्रम -2
════════════════
🔘 *उपक्रम नाव* 🔘
💠 *अक्षरगटापासून शब्द तयार करणे.* 💠
━━━━━━━━━━━━━━━━
👉 *कृती —*
🔹 *क , म , र , ब , घ , ा*
🔸 *वरील अक्षरगट देऊन शब्द तयार करण्यास सांगणे. उदा. कर , बघ , मकर , करकर , घर ,बर , मघ........*
🔹 *दिलेल्या अक्षरांना ( काना ) लावून शब्द तयार करण्यास सांगणे. उदा.घार , मार कार , राम , मका , मामा ,बकरा , माघार......*
🔸 *विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वेळ द्यावा.जो विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द तयार करेल त्याला शाबासकी देऊन कौतुक करावे.*
🔹 *अक्षरगट* 🔹
🎯 *प फ , ग, च , ध ,ि , े*
🎯 *ट , द , उ , ख , न , ण ,ु , ू*
🎯 *ध, भ , च , ढ , फ , छ , ू , ै*
🎯 *ज , ठ , थ , य , ल , ो , ं*
🎯 *श , क्ष , ष , ज्ञ , ळ , ह , ॅ , ौ*
🔷 👆 *अशाप्रकारे आपण वरील अक्षरगट विद्यार्थ्यांना देऊन शब्द तयार करून घ्यावे.*
👉 *फलश्रुती—*
🔹 *शब्दसंपत्तीत वाढ होते.*
🔸 *कल्पना शक्तीला चालना मिळते.*
🔹 *अक्षर व स्वरचिन्ह वापरून शब्द तयार करता येते.*
🔸 *अवधान टिकून राहते.*
════════════════
उपक्रम-3
════════════════
*🌝आरसा हसला,आरसा रडला😩*
━━━━━━━━━━━━━━━━
*शासननिर्णयाप्रमाणे आज शनिवार हा दप्तराविना शाळाअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.*
*या खेळाचा मुख्य।उद्देश जे मुले अबोल आसतात किंवा कोणत्याही खेळात सक्रीय भाग घेत नाहीत त्या मुलांना बोलते करण्याचे काम आरसा हसला,आरसा रडला या खेळातून होते.*
*🕺खेळ कार्यवाही किंवा सुचना🙋*
€€======€€=======€€
*🔸वर्गातील सर्व मुलांना गोल उभा करावे.*
*🔹 हा खेळ कितीही मुले खेळू शकतात.*
*🔸हा खेळ खेळण्यासाठी एका मुलांस एक मिनिटे वेळ.*
*🔹आरसा बनणाऱ्या मुलांच्या गळयात आरसा असे लिहलेल्या काडँस् आडकावून मध्यभागी उभे करावे.*
*🔸ज्याप्रमाणे आपणास आपण कृती केलेली प्रतिकृती आरसात दिसते त्याचप्रमाणे आरसा झालेल्या मुलासमोर गोलातील एक-एक विद्यार्थी हावभाव किंवा हातवारे करतील त्या़चप्रमाणे हावभाव आरसा आसणारा करेल.*
*उदा.*
*1ला 🙋हात वर करणे.*
*2रा 🙆 दोन्ही हात*. *डोक्याला लावणे.*
*3रा 🤦♀तोंडाला हात वावणे.*
*4था 💃🕺 नाचण्याची कृती करणे,*
*याचप्रमाणे विविध हातवारे किंवा हावभाव आरसा* *आसणाऱ्या मुलासमोर करावे.कृती जर करता येत नसेल तर पुढील मुलांना आरसा बनवून खेळ चालू ठेववा.*
*🔹या खेळाच्या साहयाने भाषा व गणित विषयाला देखील स्पर्श करता येतो. उदा.अंक,शब्द ओळखणे.*
*🔸या खेळातून उदयाच्या जगाला एक उत्तम कलाकार घडविण्यास मदत होईल.*
*🔹या खेळातून मुले खुप मोकळी होतात सर्व मुलांत रममाण होतात.
════════════════
उपक्रम-4
════════════════
*चला गाणे गाऊया या...!*
*स्थानिक किंमत सांगू या.....!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*विद्यार्थ्यांना स्थानिक किंमतीविषयी माहिती दिल्यानंतर गाण्याच्या साहयाने आपणास स्थानिक किंमतीचा सराव देता येतो.*
*विद्यार्थ्यांत गणिताविषयी जी भिती आसते गाण्याच्या साहयाने उदाहरणे सोडविल्यामुळे ती भिती कमी होईल व तो आनंदाने गणिते सोडवेल.*
*🔹उपक्रमासाठी साहित्य🔹*
*=====================*
*👉पूर्ण दशक संख्या काडँ,0 ते 9 संख्यांची काडँ.*
*🔸उपक्रमाची कृती🔸*
*===================*
*🔸शिक्षकांनी गाणे स्वतः म्हणावे व विद्यार्थ्यांना म्हणण्यास सांगावे.*
*🔹प्रत्येक कृतीच्या वेळी संबंधीत गाण्यातील प्रत्येक ओळीच्या पुढे दाखविलेली संख्या काडँ फळयावर लिहावीत.*
*🎵 गाणे🎵*
============
*गणिताचा तास आता,काय आम्ही करू!*
*स्थानिक किंमत काढू,आता स्थानिक किंमत काढू !!&!!*
*मनातील संख्या ही पाहु--45 (कोणतीही संख्या)*
*त्यातील अंक 4 घेऊ*
*त्यापुढची स्थाने मोजू -1*
*तेवढी शुन्ये 4 च्या पुढे ठेवू या -40*
*स्थानिक किंमत काढू आता स्थानिक किंमत काढू !!1!!*
*4च्या पुढील अंक पाच घेऊ -5*
*पाचव्या पुढे स्थान नाही म्हणून*
*पाचची किंमत पाच सांगू- 5*
*स्थानिक किंमत काढू आता स्थानिक किंमत काढू !!1!!*
════════════════
उपक्रम-5
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
🎲 *गणिती कॅरम बोर्ड* 🎲
👉 *साहित्य—*
*माउंट बोर्ड , जूना पुठ्ठा , कॅरमच्या सोंगट्या , स्र्टाईकर ( Striker.....)*
👉 *कृती—*
🎯 *माऊंट बोर्ड व जुन्या पुठ्यापासुन कॅरम बो तयार करून घ्यावा.*
🎯 *काळ्या व पांढर्या सोंगट्यावर 1 ते 9 अंक लिहून घ्यावे.*
🎯 *लाल सोंगट्यावर 10 अंक लिहावा.*
🎯 *स्र्टाईकरवर 2 ते 9 अंक लिहावे.*
*घरी जूना कॅरम बोर्ड असल्यास तो वापरता येईल.*
👉 *कार्यवाही—*
🎯 *कॅरम बोर्डच्या मध्यभागी काळ्या व पांढर्या सोंगट्या रचून ठेवणे.*
🎯 *एका वेळेस चार ते पाच विद्यार्थी खेळू शकतात.*
🎯 *एकेक विद्यार्थी स्र्काईकर घेऊन सोंगट्या उडवतील.*
🎯 *सोंगटी कोपर्यातून बाहेर आल्यावर सोंगटीवर असलेला अंक व स्र्टाईकरवर असलेला अंक यापासून लहान , मोठी संख्या तयार करणे , त्यांची बेरीज , वजाबाकी , गुणाकार करण्यास सांगणे. सर्व अचुक क्रिया केल्यावरच ती सोंगटी त्या विद्यार्थ्थास द्यावी.*
🎯 *अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्याजवळ जास्त सोंगट्या जमतील तो विद्यार्थी विजयी घोषीत करावा.*
👉 *फलनिष्पती—*
🎯 *खेळातून गणित विषयाची आवड निर्माण होते.*
🎯 *संख्याज्ञानाचे दृढीकरण होते.*
🎯 *लहान मोठी संख्या तयार करता येते.*
🎯 *तोंडी बेरीज व वजाबाकी करता येते.*
🎯 *तोंडी गुणाकार करता येतो.*
🎯 *पाढ्यांचे दृढीकरण होते.*
*$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
उपक्रम-6
*🔘खेळातून भौमितिक आकृत्याची ओळख🔼*
════════════════
*👬भाऊ भाऊ एकत्र या👬*
━━━━━━━━━━━━━━━━
*खेळाच्या साहयाने विद्यार्थ्यांना भौमितिक आकृत्त्याची ओळख करून देणारा हा एक खेळ आहे.*
*🔸खेळासाठी साहित्य* *👉पांढरी फक्की किंवा खडू,मोकळी जागा,वर्तुळ,चौरस,त्रिकोण यांची चित्रे,टपली.*
*🔸खेळाची पूर्वतयारी🔸*
*====================*
*पांढऱ्या फकीने किंवा खडूने गोल आखून ठेवणे.*
*🔹प्रत्यक्ष खेळ🔹*
*==============*
*🔹वर्गाच्या स्तरानुसार मुलांना गळयात घालता येईल अशा तऱ्हेने चौरस,वर्तुळ किंवा त्रिकोणाच्या चित्रांना टाय लावून गळयात आडकावणे.*
*🔸विद्यार्थ्यांना गोलावरून पळायला लावणे.*
*🔹मुले पळत आसताना वर्गनायकाने किंवा शिक्षकांने टपली वाजवावी.*
*🔸शिक्षकांने किंवा वर्गनायकांने टपली वाढविण्याचे थांबवून "भाऊ भाऊ" जवळ या असे सांगतील त्यावेळी ज्यांच्या गळयात त्रिकोण असतील त्यांनी एका जावी यावे व गट करावा.तसेच चौरस व त्रिकोणवाले विद्यार्थी पण आप आपला गट करतील.*
*🔹या खेळाप्रमाणेच फळे,फुले,पक्षी व प्राणी यांची चित्रे तयार करून यांचप्रमाणे खेळ घेता येईल.*
*🔸या खेळामुळे अभ्यासाबरोबर शाररिक शिक्षण विषयाला पण न्याय देता येईल.*
════════════════
उपक्रम-7
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
🐍 *शब्द सापशिडी* 🐍
👉 *साहित्य—*
*चार्ट पेपर ,थर्माकोल , प्लॅस्टिक पेपर , सोंगटी , फासा.....*
👉 *कृती—*
🔹 *प्रथम चार्ट पेपर वर पट्टीच्या साह्याने 100 सारखे रकाने काढून घ्यावे.*
🔸 *प्रत्येक रकान्यात 1 ते 100 अंक लिहून सापाची व शिडीची चिञे काढून घ्यावी.*
🔹 *काही रकान्यात स्वरचिन्हासहित अक्षरे लिहावी तर काही रकान्यात प्राणी , पक्षी यांची चिञे लावावी.*
🔸 *चार्ट पेपर थर्माकोल वर चिकटवून प्लॅस्टिक कव्हर लावावे.*
👉 *कार्यवाही—*
🔹 *चार विद्यार्थी एका वेळेस खेळ खेळू शकतात.*
🔸 *1 या अंकावर सोंगटी ठेऊन फासा टाकून खेळाची सुरूवात करतील.*
🔹 *अक्षरावर सोंगटी आल्यास त्या अक्षरापासून शब्द सांगावा.*
🔸 *प्राणी व पक्षी यांच्या चिञावर सोंगटी आल्यास त्यांची नावे व माहिती सांगावी.*
🔹 *सोंगटी शिडीवर आल्यास वर चढावे व सापाच्या तोंडावर आल्यास खाली शेपटीपर्यंत उतरावे.*
🔸 *अशाप्रकारे जो प्रथम 100 या अंकावर पोहचणार तो विजेता.*
👉 *फलश्रुती—*
🔹 *शब्दसंपत्तीत वाढ होते.*
🔸 *प्राणी व पक्षी यांची नावे व माहिती सांगतात.*
🔸 *खेळातुन भाषा विषय शिकतात.*
🔹 *विद्यार्थी आनंदाने खेळातून शिकतात.*
🔸 *दप्तरावीना शाळा या उपक्रमासाठी वरील साहित्य अतिशय उपयुक्त आहे.*
*============================*
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
उपक्रम-8
════════════════
*चला सांगा पाहु या...!*
*🕰किती वाजले....?*
━━━━━━━━━━━━━━━━
*सांगा पाहु किती वाजले?या उपक्रमातून कालमापन ही संकल्पना स्पष्ट करता येते.*
*🔹उपक्रमासाठी साहित्य🔹*
*======================*
*👉 लाल रिबीन,पिवळी रिबीन किंवा लहान दोरी,१ ते १२ संख्या काडँचा संच.*
*उपक्रमाची कृती*
==============
*🔹या उपक्रमात/गणिती खेळात एका वेळेस पंधरा मुले सहभागी होवू शकतात.*
*🔸मैदानात 2मीटर त्र्यिजेचे वतुँळ आखावे.*
*🔹प्रथम वतुँळ केंद्रावर एक काठी रोवावी.लाल व पिवळी किंवा दोरी काठीला सैलसर बांधाव्यात.*
*🔸त्यांची टोके दोन वेगवेगळ्या मुलांकडे दयावे.*
*🔹तास काटा लहान असतो म्हणून लाल रिबिनीची लांबी कमी व मिनिट काटा मोठा म्हणून पिवळया रिबीनची लांबी जास्त ठेवावी.*
*🔸गटप्रमुखाने मोठयाने वेळ सांगावी.उदा.सव्वा एक असे म्हणताच लाल रिबीन म्हणजेच तास काटा एकच्या थोडे पुढे उभे रहावे व पिवळी रिबीन धरलेल्या मुलाने तीनच्या समोर उभे रहावे.*
*🔹गटप्रमुखाने किंवा शिक्षकांने रिबिनी धरलेल्या मुलांची जागा ठरवून त्यांना उभे करावे व वतुँळा बाहेरील मुलांना विचारावे "सांगा पाहु किती वाजले"*
*या उपक्रमातून घडयाळ वाचनाचा सराव ही शैक्षणिक निष्पत्ती होते.*
════════════════
उपक्रम-9
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
🔶 *उपक्रम👉 शै.साहित्य निर्मितीने गोष्ट तयार करणे*
🔷 *शै.साहित्य👉 गोल गोष्टीचे*
🔶 *आवश्यक साहित्य👉 टाकाऊ फटाक्याचे एक लाकडी गोल,कार्ड शिट,फॅविकाॅल,मार्कर,सेलोटेप इ.*
🔷 *प्रत्यक्ष कृती* 👉
🔺 *प्रथम या लाकडी गोलच्या मापाचा पेपर कापुन घेतला*
🔺 *त्या पेपरवर ,तीन शब्दापासून गोष्टी व कविता तयार करण्यासाठी अनेक आकर्षक लेखन केले*
🔺 *पेपर लाकडी गोलला चिटकवला व हाताळताने खराब होऊ नये म्हणून त्यावर मोठा सेलोटेप चिटकवला*
🔺 *गोल गोष्टीचे साहित्य व गोष्ट तयार करणे उपक्रम वर्गात राबवण्यात आला*
🔷 *फलनिष्पत्ती*👉
🔺 *टाकाउ पासून टिकावू साहित्य निर्मिती झाली*
🔺 *तीन शब्दापासुन गोष्ट तयार करणे हा निकष पूर्ण करण्यास मदत*
🔺 *हाताळण्यास सोपे*
🔺 *कमीखर्चिक*
🔺 *आकर्षक व अध्ययनयुक्त*
उपक्रम-10
*🔘खेळातून भौमितिक आकृत्याची ओळख🔼*
════════════════
*👬भाऊ भाऊ एकत्र या👬*
━━━━━━━━━━━━━━━━
*खेळाच्या साहयाने विद्यार्थ्यांना भौमितिक आकृत्त्याची ओळख करून देणारा हा एक खेळ आहे.*
*🔸खेळासाठी साहित्य* *👉पांढरी फक्की किंवा खडू,मोकळी जागा,वर्तुळ,चौरस,त्रिकोण यांची चित्रे,टपली.*
*🔸खेळाची पूर्वतयारी🔸*
*====================*
*पांढऱ्या फकीने किंवा खडूने गोल आखून ठेवणे.*
*🔹प्रत्यक्ष खेळ🔹*
*==============*
*🔹वर्गाच्या स्तरानुसार मुलांना गळयात घालता येईल अशा तऱ्हेने चौरस,वर्तुळ किंवा त्रिकोणाच्या चित्रांना टाय लावून गळयात आडकावणे.*
*🔸विद्यार्थ्यांना गोलावरून पळायला लावणे.*
*🔹मुले पळत आसताना वर्गनायकाने किंवा शिक्षकांने टपली वाजवावी.*
*🔸शिक्षकांने किंवा वर्गनायकांने टपली वाढविण्याचे थांबवून "भाऊ भाऊ" जवळ या असे सांगतील त्यावेळी ज्यांच्या गळयात त्रिकोण असतील त्यांनी एका जावी यावे व गट करावा.तसेच चौरस व त्रिकोणवाले विद्यार्थी पण आप आपला गट करतील.*
*🔹या खेळाप्रमाणेच फळे,फुले,पक्षी व प्राणी यांची चित्रे तयार करून यांचप्रमाणे खेळ घेता येईल.*
*🔸या खेळामुळे अभ्यासाबरोबर शाररिक शिक्षण विषयाला पण न्याय देता येईल.*
════════════════
उपक्रम-11
════════════════
*🏏🕺चला शतकवीर बनू या...!!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*शतकवीर या गणिती उपक्रमातून बेरीज,संख्येची स्थानिक किंमत यांचा संबोध होतो.*
*🔹उपक्रमासाठीचे साहित्य🔹*
*=====================*
*🔸अंक आखलेला माऊंट बोडँ,रबर बँड,सुटया काडया,फासा.*
*🔸उपक्रमाची कृती🔸*
*================*
*🔹या उपक्रमात एका वेळेस चार मुले सहभागी होवू शकतात.*
*🔸शिक्षकांनी चित्रात दाखविल्याप्रमाणे तक्ता तयार करावा.*
*🔹प्रथम मुलांनी फासा टाकावा.दान पडले सहा.एककातील सहाच्या घरात चार काडया ठेवाव्यात.*
*🔸यासारखेच दुसऱ्या मुलाने फासा टाकावे व आलेल्या दानाएवढे काडया एककातील योग्य त्या घरात ठेवाव्या.*
*🔹त्यानंतर प्रत्येक वेळी जेवढे दान पडेल तेवढी घरे पुढे जावे व तेवढ्या काडया वाढवाव्यात.उदा.पहिल्या मुलाला दुसऱ्यादा दान पडले.2 तर तो पहिलेचे सहा व आताचे 2 म्हणजेच तर तो 6+2=8म्हणून सहाच्या घरातील सहा काडया उचलून त्यांत दोन मिळवून तो 8 च्या 8 काडया ठेवेल.*
*🔹यानंतर जेव्हा बेरीज दहा होईल तेव्हा दहा काडयाचा गठ्ठा किंवा जुडी बांधून दशकातल्या एकच्या घरात ठेवावी व उरलेल्या काडया एककातील योग्य त्या घरात ठेवाव्या.*
*उदा. आठ नंतर दान पडलं तीन.तर 8+4=12.म्हणून दहाचा एक दशकाचा गठ्ठा बांधून दशकातील एकच्या घरात ठेवावी व उरलेल्या दोन काडया एककातील दोनच्या घरात ठेवावीत.*
*🔸याप्रमाणे प्रत्येक वेळी दशक पुर्ण झाल्यावर जुडी किंवा गठ्ठा बांधून त्या दशकातील योग्य घरात ठेवाव्यात सुटया काडया एककातील योग्य घरात ठेवाव्यात.*
*🔹जो प्रथम 100च्या घरात जाईल.तो शतकवीर.आसेल.*
*या उपक्रमाची शैक्षणिक निष्पती :--संख्या ज्ञान व स्थानिक किंमत आणि बेरीज यांचा सराव व दृढीकरण होते.*
════════════════
उपक्रम-12
ज्ञानरचनावादी शैक्षणिक उपक्रम*
════════════════
📚 *दिसेल ते वाचा* 📚
━━━━━━━━━━━━━━━━
विदयार्थी हा सतत ज्ञानार्जनाचे काम करीत आसतो.तो सतत काहीना काही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत आसतो.मुलांच्या या शोधक वृत्तीला चालना देण्यासाठी *दिसेल ते वाचा* हा उपक्रम घेण्यात.
🌲 *उपक्रमाची कार्यवाही*🌲
==================
*मुले शाळेत लवकर येतात किंवा शालेय पोषण आहार खाल्यानंतर इतरत्र फिरत आसतात तेव्हा शाळेतील सर्व मुलांना सुचना केली वेळ जेव्हा मिळेल तेव्हा शाळेतील व्होरंडा,वर्गातील भिंती,पाण्याच्या टाकीवरील किंवा परीसरातील जे काही शब्द दिसतील त्यांना वाचावयास सांगून त्यांचे लेखन करावयास सांगीतले.मुलांना लिहुन आणलेल्या लेखनावर शिक्षकांची भुमिका ही फक्त मार्गदर्शकाची राहीली त्यामुळे मुलाच्या शब्दसंपतीत वाढ झाली.*
🌲 *उपक्रमाचे फायदे*🌲
----------------------------------------
🔸 मुले आपआपल्या गतीने शिकतात.
🔹मुले मनोरंजनातुन शिकतात.
🔸 मुले लेखन केलेले वाचन करुन दाखवत आसल्यामुळे सभाधीटपणा येतो.
🔹मुलांत शोधकवृतीची वाढ होते.
🔸मुलामुलात जास्तीचे व बिनचुक शब्द लिहण्याची स्पर्धा वाढीस लागतो.
🔹या उपक्रमात एकाच वेळी अनेक विदयार्थी सहभागी होतात.
*या उपक्रमातुन व्याकरणाचा भागपण शिकवला जावू शकतो लिहलेल्या शब्दांत नाम,सर्वनाम,विशेषण,लिंग,वचन त्याचबरोबर शब्दांवर कथा व वाक्य बनविण्याचा सराव घेतला.*
════════════════
उपक्रम-13
*🎯उपक्रम👉 शै साहित्य निर्मिती*
*🎯शै.साहित्य👉रिंगमास्टर(गणित)*
🎯 *आवश्यक साहित्य👉*
*कार्डशीट पेपर,मार्कर पेन,पेन्सिल,फेविकाॅल,रिंग(बांगडी)*
🎯 *कृती👉*
🔺 *प्रथम कार्डशिट पेपरवर गोल सर्कल आखून घेने*
🔺 *सुचीमध्ये दाखवल्या प्रमाने एकक,दशक,शतक....चे विविध रंगाचे पेन वापरुन टिपके भरणे*
🔺 *हा पेपर पुठ्याला चिटकवणे व गटामध्ये रिंग टाकावयास सांगणे*
🔺 *रिंगमध्ये जेवढ्या रंगाची ठिपके आली आहेत ते ए,द,श,ह नुसार संख्या तयार करणे व वाचणे*
🎯 *फलश्रृती👉*
🔺 *मुले हसत खेळत शिकतात.*
🔺 *मुले जेव्हा कंटाळतात,तेव्हा या साहित्याचा चांगला उपयोग होतो.*
🔺 *गणितगोडी निर्माण होते*
*=====================*
उपक्रम-14
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
*बाजारहाट*
👉 *साहित्य —*
*थर्माकोल ,खिळे, चार्ट पेपर , पुठ्ठा ,नोटा व नाणी यांचा संच*
👉 *कृती—*
🔹 *जाड चौकोनी आकाराचा थर्माकोल घ्यावा.*
🔸 *त्यावर चार्ट पेपर चिकटवून घ्यावा.*
🔹 *मध्यम आकाराचे खिळे थर्माकोलच्या मागनू टोचावे.*
🔸 *पुठ्यावर चिञ काढून वस्तुंचा संच तयार करणे.*
🔹 *पुठ्याच्या वस्तुंचा संच खिळ्यावर लटकवणे.*
🔸 *नकली नोटा व नाणी देऊन देऊन एका विद्यार्थ्याला दुकानदार व दुसर्या विद्यार्थ्यांना ग्राहक बनवून... नोटा देऊन प्रत्यक्ष खरेदी विक्रीचे व्यवहार करायला लावावे.*
👉 *साहित्याचा फायदा—*
🔹 *नोटा व नाणी यांची ओळख होईल.*
🔸 *दुकानात जाऊन पटकन तोंडी हिशोब करता येतील.*
🔹 *व्यवहारज्ञानात वाढ होईल.*
🔸 *विद्यार्थी वर्गातच प्रत्यक्ष खरेदी व विक्रीचे व्यवहार करतील.*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
उपक्रम-15
════════════════
*♦चला तर मग भाषा विषयातील....*
*शब्दांचा चढता,उतरता क्रम शिकू या.....♦*
━━━━━━━━━━━━━━━━
*🔘भाषिक खेळाविषयी सुचना🔘*
===================
🔹 *विद्यार्थ्यांना गणित विषयात संख्याचा चढता उतरता क्रम आसतो असे माहिती आसते पण आपण भाषा विषयात देखील यांचा उपयोग आपणास करून घेता येतो.सांगीतलेल्या एका अक्षरी शब्दाने सुरवात करावी,त्याच अक्षराने सुरु होणारा दोन अक्षरी शब्द लिहा.त्या शेवटच्या अक्षराने सुरु होणारा तीन अक्षरी शब्द लिहा.याप्रमाणे चार अक्षरी पाच अक्षरी ......असे शक्य तितके शब्द लिहा*. *नंतर एक एक अक्षर कमी करुन उतरत्या क्रमाने त्याच पद्धतीने लिहावे.शेवटचा शब्द एक अक्षरी असावा*.
🔘 *उदाहरण* 🔘
--------------------------
*🔸पहिल्या प्रकारात एखाद्या विशिष्ट शब्दांनेच भाषेचा चढता उतरता चालू होणारे उदाहरण---*
🔸 *क--कर--कसर--करवत---करकरीत-कमलेश---कमळ---कप---क.*
*🔹दुसऱ्या प्रकारात शब्दाच्या शेवटच्या अक्षराने संपणाऱ्या शब्दाचे उदाहरण....*
🔹 *वा--वाद--दमन--नमस्कार--रखरखाट--टरबूज--जहाल--लक--क*.
*🔘भाषिक खेळाची फलनिष्पती🔘*
===================
🔹 *भाषाच्या शब्दाप्रमाणे इंग्रजी शब्दाचाही चढता--उतरता हा भाषीक खेळ घेता येतो*.
*🔸या भाषिक खेळामुळे मुलांच्या शब्द संपत्तीत वाढ होते.*
*🔹 मुलांत एक प्रकारची लवकरात लवकर शब्द सांगून जिंकण्याची ओढ निर्माण होते.*
*🔹भाषा विषयाच्या शब्दसंपत्तीत वाढ होते.*
════════════════
उपक्रम-16
════════════════
*🕺हवेत बोटे फिरवू या...!*
*अंक,शब्द शिकू या.....!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत आहे.सर्व जण आपला विद्यार्थी व वर्ग 100% प्रगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.अप्रगत मुलांना भाषा व गणित विषयासाठी खेळातून अंक,शब्दाचे वाचन व लेखन करण्यासाठी उपक्रमाची निमीँती केली आहे.*
*🔹उपक्रमासाठी सुचना*🔹*
*=====================*
*🔸हा उपक्रम एकटाने किंवा गटागटाने खेळता येतो.*
*🔹शब्द किंवा अंक ओळखण्यासाठी एक मिनिटाचा वेळ.*
*🔸हा खेळ मैदानात किंवा वर्गात घेता येतो.*
*🔹दोन गट तयार झाल्यानंतर क्रमाने पहिल्या गटातील एक विद्यार्थी उठेल वर्गाच्या स्तरानुसार अंक हवेत बोट फिरवून विचारेल व दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यी उत्तर सांगतील.उदा.पहिलीसाठी अभ्यासक्रमावर आधारित एक अंकी किंवा दोन अंकी,तिसरी,चौथीसाठी तीन अंकी किंवा चार अंकी प्रश्न विचारतील.विरुद्ध गटाने बरोबर उत्तर दिले तर गुण मिळतील चुकीचे उत्तर दिले तर गुण मिळणार नाहीत. यांचप्रकारे शेवटी ज्या गटाला जास्त गुण मिळाले तो गट विजयी होईल.*
*याचप्रमाणे मराठी व इंग्रजी शब्दाचा पण सराव घेता येतो.*
*🔹या उपक्रमात शिक्षकांची भुमिका मार्गदर्शकाची आसेल ज्याठिकाणी विद्यार्थी चुकत किंवा अडखळत असेल तरच मार्गदर्शन करावे.*
*🔹सर्वाना प्रश्न विचारची व उत्तरे देण्याची संधी मिळेल असे पाहावे.*
*🔸कमी बोलणाऱ्या बुजऱ्या मुलांना प्रश्न विचारण्याच्या दृष्टीने विशेष प्रोत्साहन दयावे.*
*या खेळातुन मराठी, इंग्रजी, गणित या विषयाबरोबरच शा.शिक्षणाच्या विषयाला देखील स्पर्श करता येतो बोटाच्या विशिष्ट हालचालीच्या व्दारे बोटाचा व्यायम नकळत होतो.*
*अशा प्रकारे कृतीचा वापर अध्ययन अध्यापनात केल्याने अंकाच्या व शब्दाच्या संबोधाचे दृढीकरण उत्तम होते व शिक्षण आनंददायी होते.*
════════════════
उपक्रम-17
*🔹चला अलिबाबाचा खजिना लुटू या.... !!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*अलिबाबाचा खजिना लुटू या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना काळाच्या प्रकारचा सराव होणे हा आहे.*
*🔸भाषिक खेळाच्या सुचना🔸*
*=====================*
*🔸 हा खेळ एकटयाने किंवा गटागटाने खेळता येतो.*
*🔹या भाषिक खेळासाठी पाच मिनिटाचा कालावधी दयावा.*
*🔹सुरवातीला काळाची ओळख होण्यासाठी व्दारपालने जसे वाक्य सांगितले तसे विद्यार्थी सांगेल,सरावानंतर विद्यार्थी गळ्यातील काडँवरील वाचून काळाची उदाहरणे सांगेल.*
*🔸हा खेळासाठी वरच्या वर्गातील मुलांचे व्दारपालासाठी सहकार्य घ्यावे.*
*🔹खेळासाठी प्रत्यक्ष कृती🔹*
*====================*
*डोंगरात अलिबाबाची गुहा आहे गुन्हाला तीन दरवाजे आहेत तीन दरवाजावर तीन व्दारपाल आहेत.पहिल्या व्दारपालने विचारलेल्या प्रश्नाचे किंवा त्या काळाचे उदाहरण बिनचुक दिले तरच तो पुढील दरवाजाकडे जावू देतो.उदा.दोन काळाची उदाहरणे बिनचुक दिली व तिसऱ्या काळाचे उदाहरण चुकले तर परत त्याला पहिल्या दरवाजाकडे यावे लागेल किंवा तो बाद होईल व पुढील मुलांना संधी मिळेल.*
*विद्यार्थ्यांने तीन काळातील उदाहरणे बरोबर सांगीतले तर तर त्यांस अलिबाबाच्या टोपलीतील वही,पेन,चाँकलेट,गोळया किंवा इतर उत्तजनार्थ बक्षिस मिळेल.*
*🔸सुरवातीला मुलांना लक्ष्यात राहण्यासाठी किंवा होण्यासाठी व्दारपालाच्या गळयात ज्या काळाची टाय आडकावली आहे त्यांचे उदाहरण स्वतः सांगेन त्याच काळाचे उदा.विद्यार्थ्यांना सांगावयास सांगेन.*
*🔸उदाहरणार्थ🔹*
*==============*
*1)पहिला व्दारपाल--*
*(वर्तमान काळ)*
*व्दारपालच्या गळ्यात वर्तमान काळ आसेल तर तो खालील उदा.सांगेल-*
*1) राम अंबा खात आहे.*
*विद्यार्थ्यांने यासारखे..*
*👉 शाम आज गावाला जात आहे.*
*असे बरोबर उत्तर दिले तर तो पुढील व्दारपाल किंवा काळाकडे जाईल अशा प्रकारे आपणास हा भाषिक खेळ खेळता येतो.*
*या भाषिक खेळामुळे मुले हसतखेळत मराठी व्याकरणाचा भाग अध्ययन अध्यापन करतात.*
════════════════
उपक्रम-18
🏆🥇🏆🥇🏆🥇🏆🥇🏆🥇🏆
*ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य*
🐍 *भुरूपांची सापशिडी* 🐍
👉 *साहित्य—*
*माऊंट बोर्ड ,रंगित पेन्सिल ,प्लॅस्टिक कव्हर , फासा (डायस )*🎲
👉 *कृती—*
*माऊंट बोर्डवर खाली दिलेल्या छायाचिञात दाखविल्याप्रमाणे भुरूपांची सापशिडी काढून घ्यावी. त्याला प्लॅस्टिक कव्हर लावून घ्यावे.*
*चौकोनी खोका घेऊन त्याचा फासा तयार करा.* 🎲
👉 *खेळाची कृती—*
🎲 *चार विद्यार्थ्यांना एका वेळेस खेळ खेळण्यास बसवावे.*
🎲 *जेथे प्रवेश लिहिला आहे तेथे विद्यार्थ्यांना आपली सोंगटी ठेवण्यास सांगणे.*
🎲 *विद्यार्थी फासा टाकून खेळायला सुरुवात करतील.*
🎲 *विद्यार्थी फास्यावर पडलेले दान पाहून आपली सोंगटी तेथे ठेवतील.*
🎲 *विद्यार्थी खेळतांना त्याची सोंगडी दरी ,नदी ,माथा , नदीचा संगम ,हिमालय या भूरुपांवर आली तर सोंगटी खाली आणतील.*
🎲 *विद्यार्थी खेळतांना त्याची सोंगटी टेकडी , पायवाट ,शिडी , वळण ( घाट ) ,भुयारी मार्ग यावर आल्यास वर चढतील.*
🏆 *अशाप्रकारे ४३ या अंकावर जो प्रथम जाईल तो विजयी होईल.*
👉 *शैक्षणिक साहित्याचा फायदा—*
🔹 *विद्यार्थ्यांना भूरूपांची ओळख होते.*
🔸 *खेळातून भूगोल विषयीची आवड निर्माण करणे.*
🎲 *टीप— खेळ समजून घेण्यासाठी खालील छायाचिञ पाहावे.*
*============================*
उपक्रम-19
════════════════
*चला प्रश्न विचारू या...!*
*खुप माहिती मिळवू या.....!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*प्रश्न विचारु,माहिती मिळवू हा एक स्वंयअध्ययन उपक्रम आहे.हा उपक्रम पहिली ते चौथी वर्गासाठी आपणास घेता येईल.*
*🔸उपक्रमासाठी साहित्य🔸*
*=====================*
*🔹परिचित प्राणी/पक्षी/वस्तूंची रंगीत चित्रे,परिचत वस्तू.*
*🌿उपक्रमाची कृती🌿*
*=====================*
*🔸व्यक्तिग किंवा पाच-पाच मुलांचे गट पाडावेत.*
*एक गटप्रमुख नेमावा.*
*🔹दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना एकेक चित्र/वस्तू दयावे.*
*🔸एका गटातील विद्यार्थ्यांने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना चित्र/वस्तू दाखवून त्यावर आधारित प्रश्न विचारावेत.दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्तरे दयावीत.नंतर दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत,पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्तरे दयावीत याप्रमाणे सराव घ्यावा.*
*🔸उदाहरणार्थ🔸*
*=====================*
*चित्र व प्रश्न संच*
*🏍 मोटार सायकलचे चित्र.*
*प्रश्न--1)हे कशाचे चित्र आहे?*
*2) मोटारसायकलला किती चाके आहेत?*
*3) मोटारसायकलचा उपयोग कशासाठी होतो.*
*यासारखे प्रश्न एकमेकांना विचारावीत.*
*🔹या उपक्रमाला जोड म्हणून विद्यार्थ्यांच्या गळयात चित्र किंवा चित्र आडकावून त्या चित्राविषयी महिती सांगणे उदा.हत्तीचे चित्र आसेल तर तो सांगेन 1)मी हत्ती आहे. 2) माझे कान सुपासारखे आहेत. 3) माझ्या नाकाला सोंड म्हणतात. 4) माझा उपयोग अवजड ओझे वाहण्यासाठी करतात.* *यासारखे विद्यार्थ्यांच्या वर्गानुसार स्वतः प्रश्न निमीँती करुन स्वतः च उत्तरे देण्याचा सराव घ्यावा.*
*विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारण्यात चुक झाल्यास शिक्षकांनी योग्य दुरूस्ती करुन मार्गदर्शन करावे व पुन्हा विचारावयास सांगावे.*
════════════════
उपक्रम-20
*ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य*
🔷 *ठोकळा तयार करणे* 🔷
👉 *साहित्य—*
*बाॅक्स पेपर ,कैची ,पेन्सिल , स्केल , मार्कर पेन ,फेव्हीकाॅल....* 🗓✂✏📏
👉 *कृती—*
🔷 *४ सेमी. लांबी व ४ सेमी. रुंदी असलेला चौरस काढणे.*
🔶 *अशा प्रकारे चार उभे चौरस काढणे.*
🔷 *पहिला चौरस सोडून दुसर्या चौरसाच्या दोन्ही बाजुला एकेक चौरस काढणे.*
🔶 *खालील आकृतीत दिल्याप्रमाणे चौरसाच्या १ सेमी.रुंदीच्या कडा काढाव्या.*
🔷 *चौरसाच्या बाहेरील बाजू कापून काढाव्या.*
🔶 *प्रत्येक कडेला घडी घालावी.*
🔷 *बाहेरील कडेला फेव्हीकाॅल लावून तो भाग ठोकळा तयार करतांना आतील बाजूला येईल अशा प्रकारे चिकटवणे.*
🔶 *आता ठोकळा तयार झाला.*
🔷 *अशा प्रकारे आपल्याला लहान मोठ्या आकाराचे ठोकळे तयार करता येतात.*
🔶 *तयार झालेल्या ठोकळ्यावर आपण मार्कर पेनने संख्या ,अक्षर ,शब्द ,लिहून घ्यावे.*
👉 *टीप — ठोकळा समजून घेण्यासाठी खालील छायाचिञ पाहावे.*👇👇
👉 *शैक्षणिक साहित्याचा फायदा—*
🎁 *विद्यार्थी ठोकळे जोडून शब्द व वाक्य तयार करतात.*
🎁 *ठोकळ्यावरील संख्या क्रमाणे लावतात.*
🎁 *संख्यांचा चढता उतरता क्रम लावतात.*
*=============================*
उपक्रम-21
════════════════
*🏨घर देईल का कुणी मला,*
*🏦घर?..!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*घर देईल का कुणी मला,घर..? या भाषिक खेळाचा मुख्य उद्देश अर्थहीन अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनविणे.*
*🔸भाषिक खेळासाठी सुचना🔸*
*=====================*
*🔸हा भाषिक खेळात कितीही मुले सहभागी किंवा खेळता येतात.*
*🔹या खेळासाठी वेळ ५ मिनिटे देता येईल.*
*🔸प्रत्येक अचुक शब्दाला अर्धा गुण.*
*🔹भाषिक खेळासाठी शब्द पाठयपुस्तकातील कोणत्या पाठात आहेत यांची कल्पना मुलांना दयावी लागेल.*
*🔹खाली एकूण पाच अक्षरसमुह दिले आहेत.*
*🔸खरे तर प्रत्येक अक्षरसमुह म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द आहे.पण त्या शब्दातील अक्षरांचा क्रम चुकला आहे.*
*गंमत अशी झाली ही अक्षरे सुट्टीत फिरायला गेली खुप मजा केली,पण परत आल्यावर त्यांना त्यांचे घरच सापडेना.तुम्ही जर त्यांना त्यांचे योग्य घर🏦शोधून दिलात तर त्यांना त्यांचे घर मिळेन तुम्हालाही गुण मिळतील.हो,पण यासाठी ५ मिनिटाचाच वेळ आहे हं!बघू या,तुम्ही किती जणांना त्यांचे घर🏨 शोधून देता.*
*🔸उदाहरण- 🔸*
*अक्षरसमुह ---- घरे*
*१)र त दा म 🏦🏦🏦🏦*
*२)धु बं ता-- 🏦🏦🏦*
*३)वि न धा सं--🏨🏨🏨🏨*
*४)स्ता क प्रा वि--🏦🏦🏦🏦*
*५)ना पा स उ--🏦🏦🏦🏦*
*🔹सदरील भाषिक खेळाच्या साहयाने अवघड,जोडशब्द किंवा मुलांच्या लक्षात न राहणारी शब्दाचा सराव आपणास हसत खेळत घेता येतो.*
*🔸मुलांच्या शब्द संपत्तीत वाढ होते.*
*🔹आपण ज्या दिवशी जो पाठ शिकविला त्या पाठातील शब्द घेतल्यामुळे पाठाचा सराव होतो.*
*🔸उत्तरे🔸*
*१)मतदार २)बंधुता ३)संविधान ४)प्रास्ताविक ५)उपासना.*
═════════════
उपक्रम-22
════════════════
*🎲चला खेळू या...!!!*
*अंकशिडीचा खेळ....!!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*अंकशिडी खेळाचा मुख्य उद्देश खेळातून गणिती क्रियाचा सराव देता येतो*.
*🔸खेळाविषयी सुचना🔸*
----------------------------
🔹 *हा खेळ सामुहिकरित्या खेळावे येतो.हा उपक्रम एका काडँशीड किवा जागा असेल मैदानावर घेता येतो*.
🔸 *मैदानावर किंवा काडँशिटवर उभे 10 व आडवे 10 असे 100 चौकनी डबे किंवा घर तयार करावे*.
🔹 *प्रत्येक डब्याला क्रमांक दयावा.पहिल्या डब्याला एक व शेवटच्या डब्यास 100 क्रमांक दयावा*.
🔸 *प्रत्येक घरांत क्रमांकच्या खाली वर्गाच्या स्तरानुसार बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकाराची उदाहरणे दयावे*.
🔹 *जेवढे विदयार्थी तेवढे रंगीत सोंगटया🍕 घ्यावे व फासा 🎲घेवून खेळास सुरवात करावी*.
🔸 *मुलांने फासा 🎲टाकला समजा सहा पडले मुलगा सहा घरे पुढे जाईल व त्या घरात ज्या उदाहरणाचे गणित 6×8= आहे तेव्हा तो गुणाकाराची क्रिया करेल जेवढे उत्तर येईल म्हणजेच तो 48 व्या घरात जाईल व पुढील विद्यार्थ्यांना खेळण्यास तो फासा देईल.*.
🔹 *अशाप्रकारे उदा.सोडवून जो प्रथम 100व्या घरात जाईल त्यास विजयी घोषीत करावयाचे व त्याला बक्षिसाने 🏆सम्मानित करायचे.*
🔸 *अंकशिडीच्या मोठा चाटँ तयार करुन सोंगटया🍕 सोडून स्वतः मुलास🕴 थांबवून या उपक्रमाचा सराव घेता येतो*.
🔹 *या खेळाच्या साहयाने बेरीज➕,वजाबाकी➖,गुणाकार✖,भागाकार ➗या चारही क्रियाचा सराव घेता येतो*.
════════════════
उपक्रम-23
════════════════
*🔹दया टाळी.....👏🙌!!*
━━━━━━━━━━━━━━━━
*दया टाळी 👏हा उपक्रम अध्ययन अध्यापनात रंजकता आणण्यासाठी बिनखर्चाचा व मनोरंजक खेळ आहे.*
*🔸दया टाळी 👏 या खेळाची कार्यवाहीची पध्दती🔸*
*======================*
*🔹सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वर्तुळाकार बसवून घ्यावे.*
*🔸या खेळात कितीही विद्यार्थ्यांचा सहभागी करुन घेता येतात.*
*🔹वर्तुळातील कुण्याही एका मुलाला उभे टाकून या खेळाला सुरवात करता येते.*
*उदाहरणार्थ-- मी माझ्या वर्गात इंग्रजी शब्दांची मुलांना ओळख करुन करुन किंवा अध्यापन केले आहे त्यांचा सराव घेण्यासाठी प्रथम मी " B च्या शब्दाची टाळी"👏 हा खेळ घेतला तर पहिला विद्यार्थी Bat असे म्हणायचे व टाळी👏 दयावयाची तर दुसऱ्या मुलांने But म्हणून तिसऱ्या मुलांस टाळी👏 दयावयाची पुढे एकमेकांच्या हातावर टाळी खेळ चालू ठेवायचा ज्या विद्यार्थ्यांला प्रश्नाचे उत्तर येणार नाही त्या मुलांस बाद करून खेळ पुढे चालु ठेवायचा.*
*🔹वर्गानुसार चालू महिन्याच्या अभ्यासक्रमावर आधारित दररोज किंवा प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळाअंतर्गत हा उपक्रम पहिली ते आठवीपर्यत सर्वच विषयासाठी घेतला जावू शकतो.*
*जसे.उदाहरणार्थ मराठी विषयात "म" ने चालू होणारे शब्दांची टाळी ,नामाची टाळी,गावाच्या नावाची टाळी.*
*🔸 गणित विषयासाठी-अंकाची टाळी,सम व विषम संख्येची टाळी,एकक स्थानी 5 येणाऱ्या अंक सांगण्याची टाळी.वर्गाच्या स्तरानुसार प्रश्न निमीँती चढत्या क्रमाने असावी.*
*🔸परिसर अभ्यासातील पाळीव प्राणी,जंगली प्राणी,सजीव व निजीँव सांगण्याची टाळी👏 असे अनेक उदाहरणे घेता येतात.*
*🔹उपक्रमाची उपयुक्तता🔹*
*=====================*
*🔸हा उपक्रम सर्व वर्गासाठी व सर्व विषयासाठी उपयोगी आहे.*
*🔹या उपक्रमामुळे मुलांच्या अध्ययन कृत्तीला वाव व अवधानकक्षा वाढवतो.*
*🔸हा उपक्रम कोणत्याही वेळी व कुठेही खेळला जावू शकतो.*
*🔹शारीरिक शिक्षणाची देखील जोड या उपक्रमातून साधता येतो.*
════════════════
उपक्रम -24
════════════════
*चला वाक्य बनवू या...!*
*लिहू व वाचू या.....!!*
━━━━━━━━━━━━━━━━
🔹 *साहित्य:➲➨* _*रिकामी खोकी ( काडीपेटी, साबण,पेस्ट इतर) किंवा लाकडी चौकोनी 3 ठोकळ*े_
-----------------------------------------
🔹 *कृती :➲➨* _*प्रथम टाकऊ खोक्यापासुन तीन सारख्या आकाराचे ठोकळे बनवा.त्यावर कार्डपेपर किंवा पांढरा कागद चिटकावा व प्रत्येक ठोकल्यावर खालीलप्रमाणे लिहा*_
(1) *पहिला ठोकळा:*➤ *संदेश,सागर,कमला,कावेरी,हसन,अमर*_
*(2) दुसरा ठोकळा :*➤ _*अननस,पपई,गवत,पान,फणस,पाटी*_
*(3) तिसरा ठोकळा:*➤ _*बघ,आण,धर,उचल,दे,घे*
*🔹 _हे तीन ठोकळे विदयार्थाना देवून ' चला वाक्य बनवु व वहीवर लिहू 'असे व्यक्तीगत किंवा समुहात स्वयंअध्ययन दिले तर या तीन ठोकळयांपासुन 216* *वाक्य विद्यार्थी स्वतः बनवुन लिहतात_.*
*🔹 _अशा प्रकारे हळुहळु काठिण्य पातळी वाढवत जाणारे शब्द असणारे नावांचे व वस्तूंचे विविध ठोकळे तयार केल्यास विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह विकास खेळातून होईल.*_
*🔹 या उपक्रमाच्या साहयाने व्याकरणाचा सराव देखील देता येतो.*
*🔸मराठीप्रमाणे इंग्रजी विषयासाठी पण हा उपक्रम घेता येतो.*
════════════════
उपक्रम-25
*🌷उपक्रम👉*
*टाकाऊ वस्तुचा शिक्षणात वापर*
*🌷निर्मिती👉*
*टाकाऊ पासून टिकाऊ शै.साहित्य निर्मिती*
*🌷प्रत्यक्ष कार्यवाही👉*
👉प्रथम पाणी पिण्याच्या रिकाम्या बाॅटल(Bislarry bottal) जमा करण्यात आल्या.
👉काञीने पाहिजे त्या आकारात कापल्या.
👉कापल्यानंतर त्यावर पाहिजे त्या विषयाचे संबोध/संकल्पना मांडण्यात आले
उदा. गणितातील पाढे
👉लेखन करण्यासाठी permanent marker चा वापर करण्यात आले
👉आणखी आकर्षण वाढवण्यासाठी oil paint writting सुद्धा करु शकतो.
*🌷फलश्रृती👉*
🔰मुले आनंदाने अभ्यासात दंग होतात.
🔰आनंददायी शिक्षण.
🔰Learning with out burdon.
🔰use as group activity.
🔰हाताळण्यास सोपे
🔰हसतखेळत शिक्षण
🔰नवनिर्मिती/सृजनशिलता
🔰विद्यार्थ्यांसाठी नवनविन अविष्कार
🌷🌷🌷
*धन्यवाद*
No comments:
Post a Comment